रशियन हॅकर्सचा ग्रुप ‘फिनिक्स’वर संशय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची वेबसाईट गुऊवारी हॅक करण्यात आली. रशियन हॅकर्सनी ही वेबसाईट हॅक केल्याचे बोलले जात आहे. हॅकिंगचा संशय येताच मंत्रालयाने इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे. या हॅकिंगच्या माध्यमातून हॅकर्स देशातील सर्व ऊग्णालयातील कर्मचारी आणि मुख्य डॉक्टरांच्या माहिती तपशीलापर्यंत पोहोचू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटला रशियन हॅकर्सच्या फिनिक्स गटाने लक्ष्य केल्याचा दावा क्लाउड एक्सच्या सायबर सुरक्षा तज्ञांनी केला आहे. रशियन फेडरेशनवर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटला लक्ष्य करण्यात आल्याचा संशय आहे. फिनिक्स जानेवारी 2022 पासून सक्रिय असून हा गट फिशिंग घोटाळे आणि यूएस, जपान आणि ब्रिटनमधील ऊग्णालयांना लक्ष्य करण्यासाठी ओळखला जातो. अमेरिकन सैन्यात सेवा देणाऱ्या आरोग्य संस्थेच्या वेबसाईटवर आणि स्पॅनिश परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइर्टवर झालेल्या हल्ल्यामागेही याच गटाचा हात होता.
याप्रकरणी इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडून सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे. सदर यंत्रणा याची चौकशी करत असून लवकरच अहवाल सादर करतील. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. हॅकिंग आणि फिशिंगसारख्या सायबर सुरक्षा धोक्मयांना सामोरे जाण्यासाठी ही नोडल एजन्सी कार्यरत असून ती भारतीय इंटरनेट डोमेनची सुरक्षा मजबूत करण्याची सेवा पुरविते.