वार्ताहर/ कास
कास पुष्पपठारच्या हंगामाला चार दिवसापुर्वीच प्रारंभ झाला असुन पर्यटकांची पाऊले या नैसर्गिक फुलांच्या मळ्याकडे वळु लागली आहेत यामध्ये काही वरीष्ठ आधीकारी पदाधीकायांनी पठारला भेट देऊन निसर्गाचा मनमुराद आनंद लुटल्याचे पहायला मिळाले आज चक्क केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनांच कास पठारच्या फुलांची भुरळ पडली त्यांनी पुष्प पठार भेट देऊन निसर्गाचा आनंद लुटला कास हे निसर्गाचं अनमोल ठिकाण असुन त्याच जतन झालं पाहीजे येथील वनसंपदेचे वनऔषधींच संशोधन केलं पाहीजे हा परिसर अतिशय सुंदर असल्याचे गौरऊदगार त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना काढले
केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे आपल्या खाजगी दौर्यानिमीत्त मंगळवारी रात्री कास परिसरतील एका हॉटेलमध्ये मुक्कामी राहण्यास आले असल्याची माहीती समोर आली बुधवारी दुपारी त्यांनी कास पुष्प पठारला भेट दिली पठारवरील नैसर्गीक रंगीबेरंगी फुलांचा आनंद घेताना विविध फुलांची माहीती करून घेतली मात्र सततच्या पावसामुळे फुले पाहण्यात काहीसा अडथळा निर्माण झाला यावेळी त्यांनी वन वनसमीतीच्या कामाचा आढावा घेतला
वनसमीतीने पुष्पपठारची फोटो प्रेम देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी जावली तहसीलदार राजेंद्र पोळ वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी वनपाल राजाराम काशीद वनरक्षक स्नेहल शिंगाडे सुनिल शेलार निवृत्त वनपाल श्रीरंग शिंदे
वनसमीती उपाध्यक्ष दत्ता किर्दत सोमनाथ जाधव ज्ञानेश्वर आखाडे विजय वेंदे सोमनाथ बुदळे आदी पदाधीकारी उपस्थीत होते