Tarun Bharat

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाढदिनी भरगच्च कार्यक्रम

Advertisements

पणजी, दि. 30 –

गोव्याचे लोकप्रीय, लाडके नेते, उत्तर गोव्याचे खासदार केंद्रीय मंत्री श्री. श्रीपाद नाईक यांचा वाढदिवस येत्या मंगळवार दि. 4 ऑक्टोबर रोजी त्यांच्या सापेंद्र, रायबंदर येथील ‘विजयीश्री‘ निवासस्थानी भरगच्च कार्य्रक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वा. सुरू होणाऱया शुभारंभी सोहळय़ाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रहाणार आहेत. वाढदिनी केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक संपूर्ण दिवस आपल्या निवासस्थानी त्यांच्या चाहत्यांसाठी उपलब्ध असणार आहेत.

सदर दिवशी सकाळी 9 ते 10.30 या कालावधीत मधूमेह आणि रक्तदाब तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मधूमेह तपासणीसाठी येताना रुग्णांनी रिकाम्या पोटी येणे आवश्यक आहे.

 सकाळी 9 ते दुपारी 1 या दरम्यान मोफत नेत्रचिकात्सा आणि शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येईल. प्रसाद नेत्रालय ा सुपर स्पेशालिटी नेत्र रुग्णालय उडुपी, नेत्रज्योती चेरिटेबल ट्रस्ट (आर) उडुपी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजिण्यात येईल. निवडलेल्या गरजू रुग्णांना मोफत चष्मे देण्यात येतील.

या शिबिराबरोबरच मोफत ईसिजी व कार्डिओलोजी, बोन मिरनल डेन्सिटी तपासणी केली जाईल. भाजप वैद्यकीय विभाग, गोवा प्रदेशने या शिबिराची जबाबदारी सांभाळली आहे.

 या शिबिराला जोडून मोफत आयुर्वेद आणि होमिओपॅथी सल्ला आणि औषधांचे वितरण करण्यात येणार आहे. गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्र ा शिरोडा, श्री कामाक्षी होमिओपॅथी महाविद्यालय ा शिरोडा आणि सांडू फार्मस्य?टिकल्स यांच्या अधिपत्त्याखाली या शिबिरांचे आयोजन होईल.

या शिवाय जनरल चेकअप आणि औषधांचे वितरण होईल.

केंद्रीय मंत्री श्री. श्रीपाद नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून औषधी वनस्पतींचे वितरणही करण्यात येईल.

संध्याकाळी 6.30 ते रात्री 9.30 यादरम्यान रचना क्रिएशन्स निर्मित ‘गाणी मनातली‘ हा बहारदार कार्यक्रम होईल. आयडिया सारेगम फेम अमोल आणि अभिषेक पटवर्धन व साथी कलाकार हा कार्यक्रम सादर करतील.

नेत्ररुग्णांसाठी विशेष सूचना करण्यात आल्या आहेत. या सूचनांनुसार शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आलेल्या रुग्णांची त्याच दिवशी डॉक्टरांबरोबर हॉस्पिटलमध्ये जाण्याची तयारी असावी लागेल. हॉस्पिटलमध्ये जाणे-येणे, जेवणाची व राहण्याची मोफत सोय करण्यात येईल. शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात येणाऱया रुग्णांनी आधारकार्ड, डी.एस.एस.वाय. कार्ड आणि मतदान ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. सदर रुग्णाने एखादा आरोग्य विमा उतरवला असल्यास त्याची कागदपत्रे सोबत आणावी, असे संपर्ण कार्यक्रमाचे आयोजक मातृभूमी सेवा प्रति÷ान, गोवातर्फे कळविण्यात आले आहे.

Related Stories

देशाभिमानानेच पटकविली विश्वचषकासह 156 पदके

Patil_p

पिछाडीवरून वास्को क्लबने गार्डीयन एँजलला केले पराभूत

Amit Kulkarni

गोमंत विद्या निकेतनमध्ये 26 पासून वसंत गुडे नाटय़ महोत्सव

Amit Kulkarni

कविवर्य शंकर रामाणींना ‘चित्रांजली’तून आदरांजली

Amit Kulkarni

रेल्वेच्या बांधकामासाठी आणलेले साहित्य लंपास : दोघांना अटक

Amit Kulkarni

ओशेलात घराला आग लागून दीड लाखांचे नुकसान

Amit Kulkarni
error: Content is protected !!