पंतप्रधानांच्या वक्तव्याचा केला उल्लेख
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी रविवारी पंतप्रधान मोदी यांच्यावर लोकशाहीला कमकुवत करण्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान मोदी हे मतदारांना उमेदवार नव्हे तर कमळाचे चिन्ह पहा असे आवाहन करत आहेत. त्यांचे हे विधान भारताची संसदीय लोकशाही बिघडविणारे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अध्यक्षीय व्यवस्था आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला आहे.
कमळाच्या फुलाचे समर्थन करा, लोकांचे मत माझ्यासाठी आशीर्वाद आहेत. उमेदवार कोण आहे याचा विचार करण्याची गरज नाही. तुम्हाला केवळ कमळ लक्षात ठेवायचे आहे. मीच कमळ घेऊन तुमच्यापर्यंत आलो आहे असे पंतप्रधान मोदींनी हिमाचल प्रदेशातील प्रचारसभेदरम्यान जनतेला उद्देशून म्हटले हेते.
पंतप्रधान मोदींच्या याच विधानाला चिदंबरम यांनी लोकशाहीच्या व्यवस्थेसाठी घातल ठरविले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात अध्यक्षीय सत्ताप्रणाली आणण्याचा प्रयत्न करत आहे, अशा व्यवस्थेत बहुसंख्याकवाद वरचढ ठरणार असल्याचा दावा चिदंबरम यांनी केला आहे.