आयएएस अधिकाऱयाकडून व्हिडिओ शेअर
चेन्नईतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओला पाहून एक क्षणासाठी तुम्ही चक्रावून जाल. हा अखेर बुद्धीबळाचा पट आहे का ब्रिज या गोंधळात तुम्ही पडाल. परंतु तुम्हाला जर बुद्धीबळ खेळणे पसंत असेल तर हा व्हिडिओ नक्की पसंत पडणार आहे.
आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी स्वतःच्या ट्विटर हँडलद्वारे हा व्हिडिओ शेअर केला असून तो पाहून तुम्हाला प्रथमदर्शनी विश्वासच बसणार नाही. यात बुद्धीबळाचा पट असल्याचे दिसून येत असले तरीही प्रत्यक्षात तो एक ब्रिज आहे.
सोशल मीडियावर चेस ब्रिजचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. चेन्नईला भारतातील बुद्धीबळाची राजधानी म्हटले जाते. ‘भारताची बुद्धीबळाची राजधानी चेन्नई भव्य चेस ऑलिम्पियाड 2022’चे आयोजन करण्यास पूर्णपणे तयार आहे. प्रतिष्ठित नेपियर ब्रिजला बुद्धीबळाच्या पटाप्रमाणे सजविण्यात आले आहे’ असे याच्या कॅप्शनमध्ये म्हटले गेले आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर आयएएस अधिकाऱयाने शेअर केला. केवळ 21 सेकंदांचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 8 लाखाहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. तर 17 हजारांहून अधिक ट्विटर युजर्सनी व्हिडिओला लाइक केले आहे.