वेगळय़ा अन् अनोख्या प्रकारे निमर्ती
काही लोकांना स्वतःचे घर वेगळय़ा प्रकारे तयार करण्याचा छंद असतो. परंतु काही घर अशी आहेत ज्यांची निर्मिती शतकांपूर्वी करण्यात आली होती, ही घर आजही एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाहीत. ही घरे पाहून ती याच ग्रहावरील आहेत की नाहीत हा प्रश्न पडू शकतो.
ज्वालामुखीच्या राखेद्वारे निर्मिती
अजब दिसून येणारे एक घर तुर्कियेमध्ये आहे. हे घर ज्वालामुखीच्या राखेतून तयार करण्यात आल्याने ते विशेष आहे. वैज्ञानिकांनुसार लाखो वर्षांपूर्वी या भागात एका ज्वालामुखीचा विस्फोट झाला होता, त्याचा लाव्हारस पूर्ण भागात फैलावला होता. याचमुळे कुठे उंच डोंगर तयार झाले आणि याच डोंगरांमध्ये लोकांनी स्वतःचे घर निर्माण केल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
या घरात पोहून जावे लागते
पाण्याच्या मधोमध एक छोटेसे परंतु सुंदर घर सर्बिया देशामध्ये आहे. चहुबाजूने जंगल आणि पाण्याने वेढलेले घर अत्यंत सुंदर दिसते. या घराची बांधणी होऊन 50 वर्षे उलटली आहेत. या घरापर्यंत पोहोचण्याचा एक आणि एकच मार्ग आहे तो म्हणजे नौका. परंतु तेथे पोहूनही जाता येते, परंतु ते धोकादायक ठरू शकते.
दगडांना घासून निर्मिती
दगडांनी तयार केलेले घर अजब आहे. याला ‘हाउस ऑफ स्टोन्स’ या नावाने ओळखले जाते. हे घर पोर्तुगालमध्ये असून ते 1974 मध्ये तयार करण्यात आले होते. या घराचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे याच्या आत एक स्वीमिंग पूल देखली असून ते दगडांचे घर्षण घडवत तयार करण्यात आले आहे.
खोडातील घर
‘वन लॉग हाउस’ असे नाव पडलेले घर जगभरात प्रसिद्ध आहे. अमेरिकेतील हे घर 2 हजार वर्षे जुन्या झाडाच्या खोडात तयार करण्यात आले आहे. याच्या आत 13 फूट लांब जागा असून त्यात एक बेडरुम तयार करण्यात आला आहे. तर गरजेच्या सर्व गोष्टी या घरात उपलब्ध आहेत.
अंडय़ाच्या आकारातील घर चीनच्या बीजिंग शहरात ‘एग हाउस’ म्हणजेच अंडय़ाच्या आकारातील घरं तयार केली जातात. या घरात केवळ एकच व्यक्ती राहू शकतो. मूलभूत