लोकांना निराशा अन् अडचणी दूर करण्यासाठी देत आहेत सल्ले
जर तुम्ही निराश असाल तर वॉलेट उचला आणि आईस्क्रीम खाऊन या किंवा नवे बूट खरेदी करा. खूपच हताश असाल तर बेडरुममध्ये उशीवर मुक्के मारा, किंवा त्यावर डोकं ठेवून मनसोक्त रडा अशाप्रकारचे सल्ले कॅलिफोर्नियात अलिकडेच सुरू झालेल्या हॉटलाइन सेवेवर देण्यात येत आहेत. छोटय़ा मुलांच्या मधूर आवाजातील हा सल्ला लोकांनाही पसंत पडत आहे.
हीस्सबर्गमध्ये प्राथमिक शाळेच्या मुलांनी शिक्षकांच्या मदतीने ही हेल्पलाइन सुरू केली आहे. याला पेपटॉक नाव देण्यात आले आहे. हे हेल्पलाइन प्रचंड लोकप्रिय झाल्याने यावर दर तासाला 9 हजार कॉल्स येत आहेत. मुद्दा वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक ही हॉटलाइन चिंतामुक्त करण्यास मदत करते.
मुलांचा शाळेतील प्रकल्प
या मुलांना कलेचे शिक्षण देणाऱया शिक्षिका जेसिका मार्टिन आणि अशेरा वीस यांनी या प्रकल्पाची रुपरेषा तयार केली आहे. मुलांसाठी सोपे असण्यासह निराश तसेच चिंतेच्या कचाटय़ात सापडलेल्या लोकांना मदत करू असे काहीतरी करू इच्छित होतो असे मार्टिन यांनी सांगितले. हॉटलाइनवर या मुलांच्या प्रतिक्रिया आणि सल्ले त्यांच्या अनुभवातून प्राप्त होत आहेत. या प्रकल्पाच्या प्रचारासाठी या मुलांनी पोस्टर्स आणि टॅम्पलेट्स स्वतःच तयार केली आहेत.
सकारात्मक प्रतिसाद
चांगल्या विचारांसोबत लोकांपर्यंत जाणे अवघड वाटले नाही. चांगल्या गोष्टी केल्याने आम्हालाही चांगले वाटू लागते. लोकांचा प्रतिसाद अत्यंत सकारात्मक राहिला आहे. हॉटलाइनवर बोलून दिलासा मिळाल्याचे लोक आम्हाला सांगत असल्याचे उद्गार पाचवीत शिकणारया रोजली हिने काढले आहेत.
1.4 मिनिटांपर्यंत संभाषण
हॉटलाइनवर 25 प्रकारच्या रिकॉर्डिंग ऐकणाऱयांचा एक गट तयार झला आहे. महिन्यात एक हजाराच्या आसपास कॉल्स येतील असे वाटले होते. परंतु एका तासात 9 हजार कॉल्सची कल्पनाही केली नव्हती. लोक हॉटलाइनवर सरासरी 1.4 मिनिटे घालवतात. परंतु कधीकधी हा कालावधी 6-7 मिनिटे होते. अनेक लोक तर वारंवार कॉल करत असल्याचे मार्टिन यांनी सांगितले.
मुलांचा आपलेपणा भावतो.
छोटय़ा मुलांचा आवाज ऐकणे अत्यंत गोड आणि अद्भूत अनुभव आहे. उशीवर डोकं टेकून रडा किंवा ओरडून घ्या असे लहान मूल सांगते, तेव्हा लोक या आपलेपणाशी जोडले जातात. आमच्या समस्यांवर उपाय शोधणे आणि काम योग्य पद्धतीने करण्यासह पुढील पिढीला जबाबदार करण्यात ही चर्चा उपयुक्त ठरू शकते. यातू मिळणारे समाधान तर वेगळेच असल्याचे शिक्षिका अशेरा यांनी म्हटले.