प्रत्येक जण करतो नियमित योगसराव, योगसरावानंतर दररोज होतो होम
छत्तीसगडच्या कवर्धा जिल्ह्य़ातील दलपुरुवा गावात सामूहिक स्वरुपात नियमित योगसराव केला जातो. या अनोख्या उपक्रमाची सुरुवात 2014 पासून झाली, जो अद्याप सुरू आहे. सकाळी 5 वाजता सर्वजण शाळा परिसरात जमा होतात, ज्यानंतर ते एक तासापर्यंत योगसराव करतात. त्यानंतर हे सर्व ग्रामस्थ स्वतःच्या दैनंदिन कामाला सुरुवात करतात.
लोकांदरम्यान योगसंबंधी जागरुकता वाढली आहे. गावातील प्रत्येक जण नियमित स्वरुपात योगसराव करत आहे. याचा लाभ देखील त्यांना मिळतोय. अनेक लोक यापूर्वी जटिल आजारांनी ग्रस्त होते, त्यांना योगसरावाने दिलासा मिळाला आहे. हे पाहून गावातील अन्य लोक तसेच अन्य गावातील लोकांनाही योगसरावास सुरुवात केल्याची माहिती पतंजली योग समितीशी संबंधित हरेंद्र यांनी दिली आहे.


योगसराव केल्याने तन-मन स्वस्थ राहते, दलपुरुवा गावाचे लोक अन्य लोकांसाठी प्रेरणास्रोत असून अन्य गावातील लोक देखील त्यांचे अनुकरण करत आहेत. लोग योगसराव केल्यावर नियमितपणे योगस्थळीच यज्ञ हववन करतात ही यातील सर्वात खास बाब आहे. यामुळे वातावरण शुद्ध राहण्यासह मनाला शांतता मिळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित झाल्यावर जगभरात याला प्रसिद्धी मिळाली आहे. परंतु खरी प्रसिद्धी अशा गावांमधील योगबद्दलच्या प्रेमाला पाहून मिळते. येथील लोक योगचे लाभ अनुभवासह इतरांना सांगत आहेत.