Tarun Bharat

Kolhapur; महावितरणकडून अनोख्या वीज चोरीचा छडा

ग्राहक व मीटर रिडरच्या हातमिळवणीतून सुरु होती चोरी; कोल्हापूरातील साळोखेनगर येथील प्रकार

Advertisements

कोल्हापूर प्रतिनिधी

ग्राहक व मीटर रिडर यांनी हातमिळवणी करून 64 हजाराची वीज चोरी केल्याचे महावितरणने उघडकीस आणले. याप्रकरणी ग्राहक अजिंक्य रानगे व मीटर रिडर जगन्नाथ लेंगरे यांचेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा क्लृप्त्या वापरुन वीज चोरी करणाऱ्या विरोधात महावितरणने धडक मोहिम हाती घेतली आहे.

अधिक वाचा- जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया रद्द

महावितरणकडून ग्राहकांना अचूक वीज बिले देण्याच्या हेतूने वीज मीटर रिडींग प्रक्रियेवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यात मीटर रिडींगचे फोटो पडताळणी करून अस्पष्ट फोटो स्विकृती करणे बंद केले आहे. त्यासोबतच मीटर रिडरकडून घरबंद, नादुरुस्त वीज मीटर असे शेरे नोंदवून मिटर रिडींग करीत असल्याचे प्रकारांना आळा घालण्यासाठी तपासणी मोहिम राबविली जाते आहे. कोल्हापूर शहरातील साळोखेनगर भागातील एका घरगुती वीज ग्राहकाच्या वीज मिटरची तपासणी 1 ऑगस्ट 2022 रोजी करण्यात आली. या तपासणीत मिटरवर असलेले क्रोलींग बटन फुटलेले आढळले. मिटर रिडींग दर्शविणारा डिस्प्ले बंद पडल्याचे दिसले. वीज चोरीची शंका आल्याने मिटर पंचासमक्ष सील बंद करून पंचनामा व स्थळ तपासणी अहवाल करुन घेण्यात आला. शहरातील ताराबाई पार्क येथील महावितरणच्या मिटर चाचणी प्रयोगशाळेत मीटर तपासले असता, मिटरचा पुश बटण फोडून त्यामधुन केमिकल सोडण्यात आल्याचे दिसून आले. ग्राहकासमक्ष मिटर खोलून पाहिले असता, मिटरच्या आत पांढऱया रंगाचा थर जमा झाल्याचे आढळले. वीज चोरीच्या उद्देशाने मिटरचा डिस्प्ले बंद केल्याचे प्रयोगशाळेच्या तपासणी अहवालात स्पष्ट झाले.

या संदर्भाने ग्राहकास विचारणा केल्यानंतर ग्राहकाने मीटर रिडर जगन्नाथ लेंगरे यांनी हे कृत्य केल्याचे सांगितले. लेंगरे हे दरमहा वीज बिल कमी येण्यासाठी माझ्याकडून तीनशे ते पाचशें रूपये घेत असल्याचे ग्राहक अजिंक्य रानगे यांनी सांगितले. जगन्नाथ लेंगरे हे मीटर रिडर दरमहा मीटरची पेटी लॉक, घराचे गेट लॉक असल्याचे फोटो मोबाईल ऍपव्दारे अपलोड करीत होते. लॉक शेरा नोंद ग्राहकांना मोबाईल ऍपव्दारे स्वतः हून मिटर रिडींग नोंदविण्याची सूविधा महावितरणने उपलब्ध केली आहे. याकरीता ग्राहकास एसएमएस पाठविला जातो. अशा पध्दतीने मिटर रिडींग नोंद करण्यासाठी ग्राहकास नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठविला जातो. मिटर रिडर लेंगरे हे ग्राहक रानगे यांच्याकडून ओटीपी घेऊन स्वतःच दरमहा 40 ते 60 युनिट नोंदवित होते. जे प्रत्यक्ष वापरा पेक्षा कमी आहे. ग्राहक व मिटर रिडर यांनी संगनमताने मीटरमध्ये छेडछाड करून गेल्या वर्षभरात 3 हजार 982 युनिटची, आर्थिक मुल्याप्रमाणे 64 हजार 368 रुपयांची वीज चोरी करून महावितरणची आर्थिक फसवणूक केली आहे.

या प्रकरणी महावितरणच्या फिर्यादीनुसार विद्युत कायदा 2003, कलम 135, 138 व 150 अन्वये ग्राहक अजिंक्य रानगे व मीटर रिडर जगन्नाथ लेंगरे यांचेविरूध्द कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) अन्सार शब्बीर मुल्ला, सहाय्यक लेखापाल धनंजय कचरे यांनी ही कारवाई केली.

Related Stories

कोडोली सरपंचपदी शंकर पाटीलांची बिनविरोध निवड

Abhijeet Shinde

‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये ‘विष प्रयोग’

Abhijeet Shinde

अल्पवयीन मुलीची छेड करणाऱयास शिक्षा

Abhijeet Shinde

कोल्हापूर : पेठ वडगावच्या कोविड सेंटरसाठी आवश्यक सर्व मदत करू : खासदार माने

Abhijeet Shinde

नागदेववाडी पेयजल योजनेच्या चौकशीचे आश्वासन

Abhijeet Shinde

शिरोळमध्ये विनाकरण फिरणाऱ्यांवर कारवाई

Abhijeet Shinde
error: Content is protected !!