Tarun Bharat

लवकरच उपलब्ध होणार अनोखी भांडी

Advertisements

जेवणातील मीठाचे प्रमाण नियंत्रित करू शकणार

जेवणात कधीकधी मीठ कमी किंवा अधिक होत असते आणि डायनिंग टेबलवरून यासाठी उठावे लागते. संशोधकांनी आता यावर उपाय शोधून काढला आहे. तुमच्या जवळ मीठ नसल्यास अनोख्या भांडय़ामुळे मीठ मागण्याची गरज भासणार नाही आणि तुम्हाला चवीसंबंधी तडजोडही करावी लागणार नाही.

तर अधिक मीठयुक्त अन्न ग्रहण करण्याची सवय असलेल्या लोकांसाठी ही भांडी अत्यंत योग्य आहेत. जपानच्या संशोधकांनी काही स्मार्ट भांडी तयार केली असून यात मीठ कमी पडल्यास ते टाकावे लागणार नाही, तर ही भांडी जेवणाला अधिक नमकीन करणार आहेत. हे भांडे मीठाचे प्रमाण वाढविण्यासाठी इलेक्ट्रिसिटीचा वापर करते, लवकरच ही भांडी सर्वसामान्यांसाठी बाजारात उपलब्ध होणार आहेत.

जपानच्या मेईजी युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक आणि किरिन होल्डिंग्ज डेव्हलपर्सने मिळून मीठ न टाकताच जेवणाला नमकीन स्वरुप देणारी भांडी अन् चमचे तयार केले आहेत. काही महिन्यांपूर्वी अशाप्रकारचा चॉपस्टिक तयार करण्यात आला होता. या भांडय़ामध्ये एक बिल्ट बॅटरी असल्याने तिला पॉवर सप्लाय देण्याची गरज नाही. स्मार्ट चमचा आणि भांडय़ाद्वारे जेवणाला दीडपट अधिक नमकीन करता येते.

मीठाचे प्रमाण नियंत्रित करता येणार

या चमचा आणि बाऊलद्वारे अधिक मीठ कंझ्यूम करण्यापासून रोखता येणार आहे. अशा स्थितीत कमी मीठ लागणाऱया लोकांसाठी ही भांडी अत्यंत उपयुक्त आहेत. जपानच्या बाजारपेठेत पुढील वर्षापर्यंत ही उत्पादने सादर करण्यात येणार आहेत.

Related Stories

8 लाख प्लास्टिकच्या बाटल्यांवर तरंगणारे रिजॉर्ट

Patil_p

सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर लवकरच बायोपिक

prashant_c

आदिवासींमधील ‘लिव्ह इन रिलेशन’

Amit Kulkarni

chittahproject;पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडले

Abhijeet Shinde

बॉम्बवर्षावादरम्यान सैनिक जोडप्याचा विवाह

Patil_p

गुढीपाडव्यापासून सुरु होणारा ‘दगडूशेठ’ चा संगीत महोत्सव यंदा रद्द

Rohan_P
error: Content is protected !!