Tarun Bharat

वधूचे अनोखे वेडिंग फोटोशूट

Advertisements

रस्त्यांवरील खड्डय़ांवर उभे राहून फोटोशूट

सद्यकाळात वेडिंग फोटोशूट करविण्याची क्रेझ बरीच वाढली आहे. विवाहबंधनात अडकण्यापूर्वी आणि त्यानंतर वधू-वर विशेष क्षणाला स्मरणी करण्यासाठी फोटोशूट करवितात. याकरता वेगवेगळय़ा प्रकारच्या युक्त्या लढविल्या जातात. अशाच प्रकारची एक घटना केरळमधून समोर आली आहे. एका वधूने स्वतःच्या वेडिंग फोटोशूटसाठी रोड वॉक केला आहे. याहून आश्चर्याची बाब म्हणजे अनेक खड्डे असलेल्या रस्त्यावर तिने फोटोशूट करविले आहे. तिचे हे फोटोशूट आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

नववधू रस्त्यांवरील खड्डय़ांमध्ये उभी राहिल्याचे यात दिसून येते. रस्त्यावर अनेक खड्डे अन् त्यात चिखलयुक्त पाणी भरलेले असल्याने तिला मोठी काळजी घेत फोटोशूट करवावे लागले आहे. रस्त्याची दूरवस्था समोर आणण्यासह स्वतःच्या फोटोशूटला विशेष ठरविण्याचा तिचा यामागे उद्देश होता. याचमुळे तिने निसर्गाच्या सान्निध्यात किंवा पर्यटनस्थळी फोटोशूट करविण्याऐवजी खड्डे असलेल्या रस्त्याची निवड केली आहे. तिची ही कल्पना यशस्वी ठरली असून सोशल मीडियावर लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

केरळच्या वधूच्या फोटोशूटदरम्यान रस्त्यावरून अनेक वाहने  ये-जा करत होती. यामुळे तिला या वाहनांमुळे चिखल उडून तो साडीवर पडू नये याची काळजी घ्यावी लागत होती. तर फोटोग्राफरने वधूची प्रत्येक भावमुद्रा स्वतःच्या कॅमेऱयात कैद केली आहे. या फोटोशूटला इन्स्टाग्रामवर आतापर्यंत 43 लाखांहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. तर 3 लाखाहून अधिक लाइक्स प्राप्त झाले आहेत. वधूच्या या क्रिएटिव्हीटीमुळे सोशल मीडिया युजर्सही प्रभावित झाले आहेत. अनेक युजर्सनी केरळमधील रस्त्यांच्या दुरवस्थेवर टिप्पणी केली आहे.

Related Stories

गंगा नदी काठावर ५ जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ

Archana Banage

जवानांना रजेवर जाताना मिळणार MI-17 हेलिकॉप्टरची सेवा

datta jadhav

उत्तराखंड काँग्रेसचे नेते दिल्लीमध्ये; वरिष्ठाकडून पेच सोडवण्याचा प्रयत्न

Abhijeet Khandekar

तीन महिन्यांनंतर मिळणार ‘कोव्हिशिल्ड’चा दुसरा डोस

Amit Kulkarni

परकीय चलनसाठ्यात सातत्याने घट

datta jadhav

कोरोनाचा कहर! दुसऱ्या लाटेत आतापर्यंत 594 डॉक्टरांचा मृत्यू

Tousif Mujawar
error: Content is protected !!