सिगन चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित सिगन चषक वरि÷ क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात युनायटेड बालाजी संघाने सीसीआय ब संघाचा 6 गडय़ांनी तर के. आर. शेट्टी संघाने नियो मार्केटींग संघाचा 8 गडय़ांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. आक्षित व प्रणय शेट्टी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सीसीआय ब संघाने 18.3 षटकात सर्व बाद 111 धावा केल्या. दर्शनने 51 तर सिद्धार्थने 17 धावा केल्या. युनायटेड बालाजीतर्फे अजितने 15 धावात 3 तर आक्षितने 15 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनायटेड बालाजी संघाने 10.5 षटकात 4 बाद 112 धावा करून सामना 6 गडय़ांनी जिंकला. रवी राजारामने 38, आक्षितने 35 तर सुनीलने 13 धावा केल्या. सीसीआयतर्फे गौरव कांटेने 31 धावात 2 तर प्रथमेश व सुभाष गौडा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात नियो मार्केटींगने 20 षटकात 7 बाद 152 धावा केल्या. हरिषने 55 तर अजितने 54 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे वासिम धामणेकरने 24 धावात 3, रब्बानी दफेदार, अनंत माळवी व सलमान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना के. आर. शेट्टी किंग्स संघाने 18.2 षटकात 2 बाद 155 धावा करून सामना 8 गडय़ांनी जिंकला. प्रणय शेट्टीने 5 षटकार 9 चौकारासह 51 चेंडूत 90 तर सलमानने 31 धावा केल्या. निओतर्फे इम्रान फिर्दोसने 1 गडी बाद केला. सामन्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते सामनावीर आक्षित व प्रणय शेट्टी तर इम्पॅक्ट खेळाडू दर्शन व हरिष यांना चषक देवून गौरविण्यात आले.