क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
हुबळी येथे कर्नाटक राज्य कायदा विश्वविद्यालयतर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत प्रावीण्य दाखवून युनिव्हर्सिटी ब्ल्यू किताब राजा लखनगौडा लॉ कॉलेजचे खेळाडू समीक्षा चव्हाण, कोमल लाटकर यांना देण्यात आला.
हुबळी येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत समीक्षा चव्हाण तर तायक्वांदो स्पर्धेत कोमल लाटकर यांनी उत्तम कामगिरी बजावत युनिव्हर्सिटी ब्ल्यू हा मानाचा किताब पटकाविला. अलिकडच्या कालावधीत समीक्षा आणि कोमल यांनी विविध स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी केली.
विजेत्या खेळाडूंना आरएल लॉ कॉलेजचे चेअरमन एम. आर. कुलकर्णी, प्राध्यापक डॉ. ए. एच. हवालदार, प्रा. प्रसन्नकुमार, क्रीडा प्राध्यापक अमित जाधव यांच्या हस्ते त्यांचा खास गौरव करण्यात आला.