Tarun Bharat

Kolhapur : विद्यापीठ विकास आघाडीचे विद्यापीठावर वर्चस्व

विविध अधिकार मंडळातील 54 जागा बिनविरोध; विद्यापीठ विकास आघाडीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांची माहिती

कोल्हापूर प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठातील संस्थाचालक 5, प्राचार्य 8 आणि 28 अभ्यास मंडळापैकी 18 अभ्यास मंडळे यासह विविध अधिकार मंडळाच्या 54 जागा विद्यापीठ विकास आघाडीने बिनविरोध जिंकल्या आहेत. पदवीधर, शिक्षक आणि काही अभ्यास मंडळासाठी निवडणूक लागली असली तरी विकास आघाडीने ताकदीचे उमेदवार दिल्याने सर्व जागा निवडून येतील. नवीन शिक्षण कायदयाची नवीन आव्हाने पेलत शिवाजी विद्यापीठाच्या विकासात्मक कामाला प्राधान्य देणार, अशी आयोजित पत्रकार परिषदेत विद्यापीठ विकास आघाडीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी दिली.

डॉ. पाटील म्हणाले, विद्यापीठ निवडणूकीत रयत, स्वामी विवेकानंदसह सर्वच घटकांना बरोबर घेवून विद्यापीठ निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा प्राचार्य, संस्थाचालक यासह सर्वच मतदार संघात नवीन चेहऱयांना संधी दिली आहे. याचा विद्यापीठाच्या विकासासाठी नक्कीच फायदा होईल. विकास आघाडीने 26 हजार मतदारांची नोंदणी केल्याने सर्व जागा निवडून येतील अन पुन्हा एकदा विकास आघाडीचे विद्यापीठावर वर्चस्व राहील, असा विश्वास डॉ. पाटील यांनी व्यक्त केला. विकास आघडीचे उपाध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील म्हणाले, विकास आघाडीने नियोजनबध्द पध्दतीने जागा वाढवण्यासाठी प्रयत्न केला असून तो यशस्वी झाला आहे. प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील म्हणाले, विद्यापीठ निवडणूकीत विकास आघाडीला बहुमत मिळाले असूत, 54 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यंदा इंजिनिअरिंग, फार्मसी, एज्युकेशन अभ्यासमंडळावर विकास आघाडीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अमित कुलकर्णी म्हणाले, गतवर्षीपेक्षा यंदा जास्त जागा विकास आघाडीला मिळाल्या आहेत. विद्यापीठाला नॅकचे ‘ए प्लस प्लस’ मानांकन मिळण्यात विकास आघाडीचे मोठे योगदान आहे. ऍड. धैर्यशील पाटील म्हणाले, विकास आघाडीने गेल्या पाच वर्षात विद्यापीठाला डिजीटल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा झाला असून, यापुढेही विकास आघाडी डिजीटलमध्ये विद्यापीठाला पुढे घेवून जाईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

Related Stories

‘सरशी तिकडे पारशी’अशी चित्रा वाघ यांची अवस्था

Archana Banage

चार दिवसात योग्य राजकीय निर्णय घेणार

Archana Banage

Kolhapur : ‘लाल बावटा’चे आजचे आंदोलन स्थगित

Abhijeet Khandekar

कोल्हापूरच्या राजकारणाची धृवीकरणाकडे वाटचाल !

Archana Banage

शिक्षण क्षेत्राबरोबरच ग्रामीण भागाच्या विकासाला निधी देण्यासाठी प्रयत्नशील – आ.आसगावकर

Abhijeet Khandekar

माळेवाडी लघु बंधाऱ्याची पावसाळ्यापूर्वी गळती काढण्याचे निर्देश

Archana Banage