Tarun Bharat

विद्यापीठ निवडणूक 36346 पदवीधर मतदार ठरले पात्र

मतदारांची अंतिम यादी जाहीर; शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ

कोल्हापूर प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठ निवडणूक प्रक्रियेतील पुढचा टप्पा म्हणजे विद्यापीठ निवडणूक मतदारांची अंतिम यादी बुधवारी जाहीर झाले आहेत. छाननीनंतर 36 हजार 346 पदवीधर मतदार पात्र झाले असून त्यांना 14 नोव्हेंबर रोजी होणाऱया अधिकार मंडळासाठी मतदानाचा हक्क मिळणार आहे. तर शुक्रवार, 14 रोजी निवडणूक सूचना प्रसिध्द झाल्यानंतर 28 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरले जातील. प्रत्यक्ष मतदानाला अवघा महिनाभर राहिल्याने सर्वच विद्यार्थी, प्राध्यापक, संस्थाचालक, प्राचार्य संघटनांच्या बैठकांनी जोर धरला आहे.

शिवाजी विद्यापीठ निवडणुकीसाठी 28 रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. 31 राजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यावयाचे आहेत. 2 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्जांच्या वैधतेबाबत कुलगुरूंकडे तक्रार करावी. 3 नोव्हेंबर रोजी अंतिम पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द होईल. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्यक्ष मतदान होईल. 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार असून निकाल जाहीर होईल. पात्र मतदारांची अंतिम यादी जाहीर झाल्याने मतदार कोण आहेत हे निश्चत झाले आहे. परिणामी उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अद्याप उमेदवार कोण हे संघटनांनी जाहीर केले नसले तरी काही उमेदवार ठरलेले आहेत, अशी चर्चा शिक्षण क्षेत्रात आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर पात्र उमेदवारांना प्रचार करण्यासाठी आवघे दहा दिवस मिळणार आहेत. त्यामुळे आतापासूनच संघटनांसह इच्छुकांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. यंदा विद्यापीठ विकास आघडी, सुटा आणि समविचारी संघटना शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवणार आहे. सध्यातरी तिरंगी निवडणूक होणार असेच चित्र असून, भविष्यात आणखी एखादी संघटना उठून बसली तर बहुरंगी निवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पात्र उमेदवारांची मतदार संघानुसार अंतिम मतदार यादी
शिक्षक मतदार संघ : 2945
बि. ओ. एस. महाविद्यालय विभागप्रमुख : 937
प्राचार्य मतदार संघ : 93
व्यवस्थापक सदस्य, संस्थाचालक मतदार संघ : 116
विद्यापीठ शिक्षक : 166
पदवीधर : 36343

Related Stories

सातारा विकास आघाडीचा बटरफ्लाय पाँईट सापडणार वादाच्या भोवऱयात

Patil_p

कोल्हापूर हीच माझी कर्मभूमी

Archana Banage

जांभळीत बेकायदेशीर ७५ हजाराचे देशी मद्य साठवणुक,विक्री करणाऱ्या एकास अटक

Archana Banage

कोल्हापूर : कळंबा कारागृहातून आजवर १७८ बंदींना पॅरोलवर सोडले

Archana Banage

वारणा धरण ५० टक्के भरले, धरणात १८.८३ टीएमसी पाणीसाठा

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात 10 हजार ऑक्सिजन बेडचे नियोजन : पालकमंत्री

Archana Banage