प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील आरपीडी क्रॉस येथे सारस्वत बँकेसमोर एक अज्ञात व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आला. या घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि पोलिसांनी रुग्णवाहिकेला पाचारण करून अधिक उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले.दरम्यान सदर व्यक्ती बेशुद्ध होण्याचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.