नवी दिल्ली
उन्नाव बलात्काराशी संबंधित एका प्रकरणाची सुनावणी उत्तरप्रदेशातून दिल्लीत स्थानांतरित करण्याच्या पीडितेच्या मागणीला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मंजुरी दिली आहे. उन्नाव जिल्हा न्यायालयात प्रलंबित खटला दिल्लीत स्थानांतरित करण्याची मागणी पीडितेने केली होती. एका आरोपीच्या पित्याने पीडितेच्या विरोधात तक्रार नोंदविली आहे. पीडितेकडून पोलिसांना देण्यात आलेले वयाचे दस्तऐवज बनावट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या विरोधात उन्नाव येथील न्यायालयाने अजामिनपात्र वॉरंट बजावले होते.