Tarun Bharat

उन्नती हुडा उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

थायलंडमध्ये सुरू असलेल्या 15 आणि 17 वर्षाखालील वयोगटाच्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या उन्नती हुडाने महिलांच्या 17 वर्षाखालील वयोगटात एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

उन्नती हुडाने यापूर्वी ओदिशा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. थायलंडमधील स्पर्धेत झालेल्या लढतीत उन्नतीने थायलंडच्या नुचेव्हीचा 21-11, 21-19 अशा गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या 8 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे. आता उन्नती हुडा आणि दक्षिण कोरियाची किम यांच्यात शनिवारी उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. पुरुषांच्या 17 वर्षाखालील वयोगटात भारताच्या धुव नेगी आणि अनमोल खराब यांना मात्र पराभव पत्करावा लागला. पुरुष दुहेरीत भारताच्या अर्श मोहम्मद आणि संस्कार सारस्वत यांनी इंडोनेशियाच्या दानीसवेरा आणि मुकुन यांचा 21-12, 21-10 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. मिश्र दुहेरीत भारताच्या अरुण रवि आणि श्रीनिधी नारायणन यांनी थायलंडच्या ऍकेत आणि मिजाद यांचा 21-14, 21-17 असा पराभव केला.

Related Stories

विराट, रोहित, बुमराह अव्वल श्रेणीत कायम

Patil_p

10 हजार मीटर्समध्ये इथिओपियाचा बरेगा अजिंक्य

Patil_p

कोव्हिड-19 लढय़ात लस मिळाल्यानंतरच क्रिकेट सुरु करा

Patil_p

शिबिरासाठी 28 कनिष्ठ महिला हॉकीपटूंची निवड

Patil_p

मुगुरुझा उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

भारताच्या विश्वनाथन आनंदला नववे स्थान

Patil_p