पुणे / वार्ताहर :
येरवडा येथील प्रादेशिक मनोरूग्णालयात एका मनोरूग्णाने दुसऱ्या अल्पवयीन मनोरूग्णावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका 24 वर्षाच्या तरूणावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबात प्रादेशिक मनोरूग्णालयाचे परिचर धनराज सोनवणे (58, रा. जाई जुई शासकीय वसाहत, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 8 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान प्रादेशिक मनोरूग्णालयातील उंचवार्ड बराक नंबर 44 मधील खोली नंबर 4 मध्ये घडला. पिडीत मुलाने रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना याबाबत सांगितल्यानंतर गुन्हा उघडकीस आला. गुन्हय़ाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गाताडे करत आहेत.
अधिक वाचा : पुणे विद्यापीठाच्या शुल्कवाढीविरोधात बेमुदत उपोषण