Tarun Bharat

UNO : ”मोदींच्या भाषणानंतर कोणीही टाळ्या वाजवल्या नाहीत”

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी [ Nrendra modi ] अमेरीका दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले होते. या भाषणानंतर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात केंद्र स्तरापासून ते जागतिक स्तरापर्यंत अनेक नेते यात सहभागी होते. या प्रतिक्रियांमध्ये काही सकारात्मक आहेत तर काही नकारात्मक आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह [ Rajnath singh ] यांनी मोदींचे भाषण “उत्कृष्ट” असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे. तर मोदींच्या भाषणानंतर कोणीही टाळ्या वाजवल्या नाहीत असा टोला काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार पी. चिदंबरम [ p chidambaram ] यांनी लगावला आहे.

चिदंबरम यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधानांच्या अभिभाषना दरम्यान फक्त काही जागाच भरल्या गेल्या आहेत असे म्हटले आहे. यामुळे संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमचे मिशन विस्कळीत झाल्याचे चिदंबरम यांनी म्हटले आहे. त्यामुळे यावर आता भाजप नेते या टीकास्त्राला कोणत्या शब्दात उत्तर देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

वाचा सविस्तर संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करताना काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मो़दी

Related Stories

राष्ट्रपती मुर्मू यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

Patil_p

…तरच राज्यात लॉकडाऊन : आरोग्यमंत्री

Archana Banage

हाफिज सईदला 10 वर्षांचा तुरुंगवास

datta jadhav

राज्यात प्राप्तिकरचे 30 ठिकाणी छापे

Patil_p

कर्नाटक हायकोर्टाच्या निर्णयाने अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टला मोठा धक्का

Archana Banage

जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा सुरू

prashant_c