Tarun Bharat

मुरगावच्या नगराध्यक्षपदी लियो रॉड्रिक्स यांची बिनविरोध निवड

Advertisements

प्रतिनिधी /वास्को

मुरगावच्या नगराध्यक्षपदी नगरसेवक लियो रॉड्रिक्स यांची बिनविरोध निवड झाली आहे. नवीन नगराध्यक्ष निवडण्यासाठी आज सोमवारी सकाळी बैठक बोलावण्यात आलेली आहे. या बैठकीत रॉड्रिक्स यांची बिनविरोध निवड अधिकृतरीत्या जाहीर करण्यात येईल.

  नगरसेवक दामोदर कासकर यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनाम दिल्यापासून मुरगावचे नगराध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे आज सोमवारी नवीन नगराध्यक्ष निवडण्यासाठी r बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला निर्वाचन अधिकारी म्हणून मुरगावचे निर्वाचन अधिकारी रविशेखर निपाणीकर उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत नगरसेवक लियो राड्रिक्स यांची मुरगावच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात येणार आहे. काल रविवारी दुपारपर्यंत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी वेळ देण्यात आली होती. लियो राड्रिक्स यांनी दोन दिवसांपूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, रविवारी दुपारपर्यंत अन्य कुणीही उमेदवार अर्ज दाखल केला नाही. नगराध्यक्षपदासाठी लियो रॉड्रिक्स यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झालेली आहे. आज होणाऱया बैठकीत रॉड्रिक्स यांची नगराध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्याची औपचारीकता निर्वाचन अधिकारी पार पाडणार आहेत.

लियो रॉड्रिक्स हे मागच्या पंधरा वर्षांपासून भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते असून मुरगावचे नगरसेवक म्हणून प्रथम ते बायणातील प्रभागातून निवडून आले होते. मागच्या पालिका निवडणुकीत ते चिखली व वाडेतील प्रभाग पंचवीसमधून निवडून आले. मुरगाव पालिका मंडळात सध्या भाजपाच्या बाजुने 16 नगरसेवक आहेत. तर काँग्रेसच्या बाजुने 9 नगरसेवक आहेत. भाजपाकडे भक्कम बहुमत असल्याने नगराध्यक्षपदासाठी विरोधी गटाने उमेदवारी दाखल केलेली नाही. नगरसेवक रॉड्रिक्स हे विद्यमान पालिका मंडळातील दुसरे नगराध्यक्ष ठरणार आहेत.

Related Stories

‘मोपा लिंक रोड’प्रकरणी सर्व याचिका फेटाळल्या

Amit Kulkarni

असोल्डा पंचायत परिसरात 7 ते 14 स्वेच्छा लॉकडाऊन

Amit Kulkarni

वेलिंग येथील श्री शांतादुर्गा शंखवाळेश्वरी देवीच्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम

Amit Kulkarni

महाराष्ट्र सरकारला आम्ही प्रत्युत्तर देणार नाही

Omkar B

कोरोना रुग्णसंख्या प्रतिदिन एक हजारपर्यंत जाणार

Patil_p

पाठिंबा घेऊ नका, मंत्रीपद देऊ नका

Amit Kulkarni
error: Content is protected !!