Tarun Bharat

तिरंगा अभियानाला अभूतपूर्व प्रतिसाद

Advertisements

भारतीय जनता पक्षाचे प्रतिपादन, कोटय़वधी घरांवर राष्ट्रध्वज फडकणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानाला देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आले आहे. देशभरातील 20 कोटी घरांवर तिरंगा ध्वज फडकविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून त्याची पूर्तता निश्चितपणे होईल, असे आतापर्यंतच्या प्रतिसादावरून दिसत आहे.

भाजपचे महासचिव अरुण सिंग यांनी यासंबंधी पत्रकारांना माहिती दिली. आज शनिवारी येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या हस्ते एका प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून त्यात स्वातंत्र मिळत असताना झालेल्या देशाच्या फाळणीच्या स्मृतींना उजाळा देण्यात येणार आहे. 14 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताची फाळणी करण्यात आली होती. पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन याच दिवशी साजरा होतो. ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राष्ट्रीय एकात्मता आणि सार्वभौमत्व भावना दृढ करण्यासाठी हाती घेण्यात आलेले आहे.

हा जगाला संदेश

भारत देश एकात्म असून आपला स्वाभिमान, संस्कृती आणि सार्वभौमत्वाविषयी अत्यंत जागरुक आहे, असा संदेश या अभियानातून जगाला दिला जाणार आहे. 9 ऑगस्टपासूनच या अभियानाचा प्रारंभ झाला असून आता हे अभियान देशाच्या कानाकोपऱयात पोहोचले आहे. भाजपचे खासदार आणि अन्य लोकप्रतिनिधी लोकांना त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज फडकविण्याविषयी जागरुक करीत आहेत. सर्वसामान्य लोकांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षाही अधिक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. या अभियानासाठी ध्वजसंहितेमध्ये काही परिवर्तन करण्यात आले आहे.

सेल्फी काढून पाठवा

स्वतःच्या घरावर राष्ट्रध्वज फडकविल्यानंतर त्या ध्वजासह आपले स्वयंछायाचित्र (सेल्फी) काढून ती भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करावी, असे आवाहन भाजपने केले आहे. असंख्य लोकांनी आतापर्यंत यासाठी तिरंगा ध्वज घेतला असून पूर्वनिर्धारित लक्ष्यापेक्षाही अधिक घरांवर राष्ट्रध्वज फडकलेला दिसेल, असा विश्वास भाजपच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे.

ध्वजसंहितेत परिवर्तन

दि. 13, 14 आणि 15 ऑगस्ट असे तीन दिवस रात्रंदिवस घरावर राष्ट्रध्वज फडकविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी ध्वजसंहितेत परिवर्तन करण्यात आले असून रात्रीही ध्वज फडकता ठेवण्याची अनुमती देण्यात आली आहे. नेहमीच्या नियमानुसार सूर्यास्ताच्यावेळी ध्वजावतरण करावे लागते. पण यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असल्याने ध्वजसंहितेत सूट देण्यात आली आहे.

पॉईंटर्स

राष्ट्रध्वजाबद्दल मोठय़ा प्रमाणावर आस्था

@अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य वर्षानिमित्त नागरिकांमध्ये अभूतपूर्व उत्साह

@घरांवर राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी कोटय़वधी नागरिक उत्सुक, सज्ज

Related Stories

भाजपचे आमदार गौतम लाल मीणा यांचे कोरोनाने निधन

datta jadhav

प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींनी मोडली 48 वर्षांची परंपरा

Abhijeet Shinde

गुन्हेगारांची संपत्ती गरीबांमध्ये वाटणार; लवकरच कायदा

datta jadhav

12 प्रकारचे असते मीठ

Patil_p

काश्मीर : गस्ती पथकावर दहशतवादी हल्ला; 2 जवान, एक एसपीओ शहीद

datta jadhav

कोरोना नियंत्रणासाठी त्वरित पावले उचला

Patil_p
error: Content is protected !!