प्रतिनिधी /म्हापसा
सोमवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे बार्देश तालुक्यात झाडांची बरीच पडझड झाली. यात म्हापसा न्यायालयाजवळ राहत असलेल्या क्रीश नाईक यांच्या दुचाकीवर आंब्याचे झाड पडून दुचाकीचे नुकसान झाले. रात्री उशीरापर्यंत वीज पुरवठाही खंडित होता. म्हापसा आल्तीनो येथे झाड पडल्याने उमेश नाईक हे जखमी झाले.
दरम्यान राण्याचे जुवे येथे रेश्मा हळदणकर यांच्या घरावर माड पडून त्यांचे बरेच नुकसान झाले. यात त्यांच्या घराची कौले आदी फुटून पडली. दरम्यान म्हापसा अग्निशमन दलास बार्देश तालुक्यात एकूण 30 झाडांची पडझड होऊन अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे कळविण्यात आले आहे.