35 संघांचा सहभाग : नावे नोंदविण्याचा शेवटचा दिवस आज
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
अनिल बेनके स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित पाचव्या अनिल बेनके चषक निमंत्रितांच्या ऑल इंडिया क्रिकेट स्पर्धेच्या चषकाचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले. या स्पर्धेत आजपर्यंत 35 नामवंत संघांनी भाग घेतला आहे.
आमदार अनिल बेनके यांच्या सभागृहात आयोजित चषकांच्या अनावरण प्रसंगी प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, पालकमंत्री गोविंद कारजोळ, शिक्षणमंत्री अश्वथ नारायण, अनिल बेनके आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते चषकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी राहुल जाधव, विनायक पवार, मनोज ताशिलदार, सुनिल नायडु, राहुल मुचंडी, नागेश लंगरकांडे, राजीव सदरे, संजय जाधव, विश्वजीत चौगुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या स्पर्धेत आतापर्यंत मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात, हैद्राबाद, बेंगळूर व बेळगाव स्थानिक येथून जवळपास 35 नामवंत संघांनी सहभाग दर्शविला आहे. स्पर्धेची नावे नोंदविण्याची मंगळवारी अंतिम दिवस असून सायंकाळी 6 पर्यंत आपली नावे नोंदवावित. त्यानंतर स्पर्धेचे लॉट्स काढण्यात येणार आहेत. तरी इच्छुक संघांनी अधिक माहितीसाठी राहुल जाधव, मनोज ताशिलदार यांच्याशी संपर्क साधावा.