Tarun Bharat

‘घरकुल 2022’ प्रदर्शनाच्या दरपत्रकाचे अनावरण

Advertisements

रोमा ठाकुर यांची उपस्थिती :  25 ते 30 नोव्हेंबरदरम्यान सीपीएड मैदानावर प्रदर्शनाचे आयोजन

प्रतिनिधी /बेळगाव

तरुण भारत पुरस्कृत ‘घरकुल 2022’ गृह बांधणीसाठी लागणारे सर्व साहित्य एकाच छताखाली या प्रदर्शनाच्या दरपत्रकाचे अनावरण व बुकिंग शुभारंभ बुधवारी करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम-बेळगाव आयोजित व कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशन, बेळगाव यांच्या सहकार्याने 25 ते 30 नोव्हेंबरदरम्यान सीपीएड मैदानावर हे प्रदर्शन भरविले जाणार आहे. दरपत्रकाचे अनावरण भाग्यनगर येथील लोकमान्यच्या कार्यालयात बुधवारी ‘तरुण भारत’च्या कार्यकारी संचालिका रोमा ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले.

रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष उमेश रामगुरवाडी, इव्हेंट चेअरमन आनंद चौगुले, कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष संग्राम पाटील, इव्हेंट चेअरमन सी. आर. पाटील, तरुण भारतचे सीएमओ उदय खाडीलकर यांच्या उपस्थितीत दरपत्रकाचे अनावरण झाले. रोमा ठाकुर यांनी शुभेच्छा देत सर्वांच्या मेहनतीमुळे प्रदर्शन यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

संग्राम पाटील यांनी 2003 पासून सुरू असलेल्या घरकुल प्रदर्शनाविषयी माहिती दिली. लोकांचा ओढा वाढत गेल्याने बेननस्मिथ कॉलेज ग्राऊंडवरून मराठा मंदिर तर आता सीपीएड मैदानात प्रदर्शन आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. उमेश रामगुरवाडी यांनी सर्व सदस्यांचे कौतुक करत नागरिकांना प्रदर्शनात नवीन साहित्य पाहता येईल, अशी व्यवस्था करण्यात आल्याचे स्पष्ट केले. उदय खाडीलकर यांनी प्रास्ताविक करत ‘तरुण भारत’मधील घरकुल पुरवणी ते घरकुल प्रदर्शन प्रवास उलगडला.

स्टॉलधारकांचा सत्कार

घरासाठी सर्व काही एकाच छताखाली असे हे प्रदर्शन आहे. टाईल्स ते फर्निचर व सिमेंट ते इंटेरिअरपर्यंत सर्व साहित्य पाहता येणार आहे. प्रदर्शनाचे दरपत्रक जाहीर करताना स्टॉलधारकांनी बुकिंगला सुरुवात केली. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वीरधवल उपाध्ये, सचिन हंगिरगेकर, अशोक पाटील, शैलेश व भावेश पटेल, संतोष हळदणकर, ऋषिकेश पाटील, पार्श्व देवाणी यांचा सत्कार करण्यात आला. आर्किटेक्ट संघटनेचे अध्यक्ष कुलदीप हंगिरगेकर यांचाही सत्कार करण्यात आला.

रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे सदस्य महेश अनगोळकर, डी. बी. पाटील, राजेशकुमार तळेगाव, संजीव देशपांडे, पंकज पवार, चंद्रकांत राजमाने, शशीधर नाईक, विजय पाटील, कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनचे सदस्य मल्लिकार्जुन मुदनूर, रमेश जी. टी., आनंद कोहळ्ळी, संदीप तुबची, तरुण भारतचे मार्केटिंग मॅनेजर सोहन पाटील, अमित असलकर, विनय पाटील, सुहास देशपांडे, कलमेश हन्नूरकर उपस्थित होते. संदीप जोग यांनी सूत्रसंचालन केले.

Related Stories

खानापूर शहरात 469 घरांची निर्मिती होणार

Amit Kulkarni

नोटा तिप्पट करणाऱया टोळीतील चौकडीला अटक

Patil_p

बेळगाव, कित्तूर, बैलहोंगल उपांत्य फेरीत

Amit Kulkarni

चोरी प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची धडक तामिळनाडूला

Omkar B

पिरनवाडी प्रो लीग कबड्डी स्पर्धेत सुनील एन्टरप्रायझेस विजेता

Amit Kulkarni

कोरोना योद्धय़ांवर हल्लाप्रकरणी मरणहोळ येथील वृद्धाला अटक

Patil_p
error: Content is protected !!