Tarun Bharat

शंभू स्मारकाच्या प्रतिकृतीचे अनावरण

Advertisements

निधी संकलनासाठी जोरदार प्रयत्न करण्याचा निर्धार

प्रतिनिधी/ कराड

येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारणीस जिल्हाधिकाऱयांनी मंजुरी दिली आहे. घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर या स्मारकाच्या प्रतिकृतीचे अनावरण कराड अर्बन बँकेच्या शताब्दी हॉलमध्ये मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्मारकाच्या निधी संकलनासाठी शहर व तालुक्यातून जोरदार प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला.

 भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले, कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, हिंदू एकताचे विनायक पावसकर, मुकुंद चरेगावकर, माजी नगरसेवक सौरभ पाटील, विजय वाटेगावकर, अतुल शिंदे, पोपटराव साळुंखे, स्वाती पिसाळ, विद्या मोरे, सारिका गावडे, सचिन वास्के, अभिजित भोपते, सुनील शिंदे, सचिन राऊत, किरण शिंदे, ओंकार पलंगे, दीपक मोरे, सागर आमले  आदींच्या उपस्थितीत या स्मारकाच्या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले. यावेळी स्मारकाच्या उभारणीबाबत गेली दोन वर्षे सुरू असलेला पाठपुरावा व प्रयत्नांची चित्रफित उपस्थितांना दाखवण्यात आली.  

  विनायक पावसकर, अतुल शिंदे, विजय वाटेगावकर, सौरभ पाटील, वास्के, स्वाती पिसाळ, विद्या मोरे यांनी निधी संकलनाबाबत विविध सूचना केल्या. निधी संकलनासाठी प्रयत्न करून लवकरात लवकर भूमिपूजन करावे, असे सुचवले. ऍड. दीपक थोरात यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र माने यांनी आभार मानले.  

स्मारक समितीचे सचिव रणजित पाटील (नाना) यांनी स्मारकाच्या उभारणीचा आढावा घेत स्मारकास सात महिन्यात सर्व शासकीय विभागांच्या परवानग्या मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱयांनी अंतिम मंजुरी दिली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री शंभूराज देसाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आता स्मारकाच्या उभारणीचा टप्पा सुरू होणार आहे. यासाठी निधी संकलनावर जोर देणे आवश्यक आहे. आतापर्यंत सर्वांचे सहकार्य लाभले आहे. निधी संकलनासाठी शिव-शंभूप्रेमींच्या सूचनांचे स्वागत आहे, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी 20 कोटींचा निधी

Archana Banage

कोरोना : नागपूरमध्ये दिवसभरात 6,956 नवे बाधित; 79 मृत्यू

Tousif Mujawar

महाराष्ट्र : यंदाच्या गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी

Tousif Mujawar

महेश मांजरेकरांना अटकेपासून दिलासा

datta jadhav

एकनाथ शिंदेंच्या बंडावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; मुख्यमंत्री कोणाला करायचं हे सेना ठरवेल

Archana Banage

नगरमध्ये तोतया कमांडोला अटक

datta jadhav
error: Content is protected !!