Tarun Bharat

UP सरकारमधील तंत्रशिक्षण मंत्री कमल वरूण यांचा कोरोनामुळे मृत्यू

ऑनलाईन टीम / लखनऊ : 

उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या कमल वरूण यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. लखनऊमधल्या एसजीपीजीआय रुग्णालयात त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला.

कमल राणी वरुण योगी सरकारमध्ये तंत्रशिक्षण मंत्री होत्या. 2017 मध्ये भाजपाने त्यांना कानपूरमधील घाटमापूर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. या जागेवरून विजयी झालेल्या त्या भाजपाच्या पहिल्या उमेदवार होत्या. पक्षातील त्यांचे योगदान पाहून भाजपाकडून त्यांना 2019 मध्ये कॅबिनेट मंत्री बनवले.

मागील महिन्यात प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 18 जुलैला त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना लखनऊमधल्या एसजीपीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.

Related Stories

घरगुती गॅस महागला

Amit Kulkarni

”कोणीही कितीही अफवा पसरविल्या तरी महाविकास आघाडी सरकार हे स्थिर व मजबूत”

Archana Banage

भीमा कोरेगाव प्रकरण : शरद पवारांची तिसऱ्यांदा नोंदवली साक्ष

Archana Banage

जम्मू-काश्मीरमध्ये 7 दहशतवाद्यांना अटक

Patil_p

लाख-कोटींमध्ये नव्हे, केवळ 86 रुपयांत घर

Patil_p

लोकप्रतिनिधींना गाडण्याच्या उदयनराजेंच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…

Archana Banage