ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये शनिवारी नोकर भरतीसाठी कँडल मार्च काढणाऱ्या तरुणांवर उत्तर प्रदेश पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावर लोकांच्या गंभीर प्रतिक्रीया उमटत आहेत. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील या प्रकरणाची दखल घेत कठोर शब्दात टीका केली आहे. रविवारी लखनऊमध्ये सहाय्यक शिक्षकाच्या भरतीसाठी कँडल मार्च काढणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेवर सर्व स्तरातून गंभीर प्रतिक्रिया येत आहेत.
लखनऊमधील या घटनेचा व्हीडिओ शेअर करत राहुल गांधींनी निषेध केला आहे. रोजगार मागणाऱ्यांवर उत्तर प्रदेश सरकारने लाठीचार्ज केला. भाजप जेव्हा मतदान मागण्यासाठी येईल तेव्हा हे लक्षात ठेवा असं म्हणत राहुल गांधींनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली.