अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठी घोषणा
ऑनलाईन टीम/ तरुण भारत
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला असून यामध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. योगी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या अर्थसंकल्पात निराधार महिला, वृद्ध, निवडक विद्यार्थी यांना पेन्शन- स्कॉलरशीप जाहीर केली आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघासह आपल्या मतदारसंघासाठीही मेट्रोची घोषणा केली आहे. त्याचबरोबर प्रत्येक घरातील एका तरुणाला नोकरी देण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केली आहे.
युपीचे अर्थमंत्री विनोद खन्ना यांनी दोन दिवसांपूर्वी ६ लाख १५ हजार ५१८ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये वृद्धांना १००० रुपये पेन्शन, शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास ५ लाखांची नुकसान भरपाई, विधवा महिलांना पेन्शन आदी घोषणा केल्या आहेत. त्यानंतर, विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांनी रोजगारासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना सरकारचा प्लॅनच सांगून टाकला
त्यानंतर विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांनी रोजगारासंदर्भात प्रश्न विचारला असता योगींनी ‘युवकांसाठी सरकार सज्ज आहे, त्यांच्या रोजगारासाठी सरकारने काही योजना तयार केल्या आहेत’, असे सांगितले. शिवाय, ‘सरकारकडून रोजगार कार्ड जारी करण्यात येणार आहे. त्यानुसार, प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला रोजगार देण्यात येईल. आम्ही पोलीस खात्यात ५ लाख नोकऱ्या दिल्या. पण एकही प्रश्न विचारण्यात आला नाही. योग्येतनुसार उमेदवारांची तेथे निवड झाली आहे. राज्यात १ कोटी ६१ लाख युवकांना रोजगार देण्यात येणार असून६० लाख स्वयंरोजगाराचीही योजना आहे’, असे योगींनी सांगितले.