Tarun Bharat

ज्ञानवापी मशिदीबाबत कनिष्ठ न्यायालयात सुनावणी नाही – सुप्रीम कोर्ट

ऑनलाईन टीम/तरुण भारत

वाराणसीमधील बहुचर्चित ज्ञानवापी मशिदीबाबत (Gyanvapi mosque) सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) गुरुवारची सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली. तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने वाराणसीच्या कनिष्ठ न्यायालयाला या प्रकरणी सुनावणी करू नये किंवा आदेश जारी करू नये, असे निर्देश दिले आहेत.

बहुचर्चित ज्ञानवापी मशिदीबाबत गुरुवारी होणारी सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारपर्यंत तहकूब केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने वाराणसीच्या कनिष्ठ न्यायालयाला या प्रकरणावर सुनावणी घेऊ नये किंवा आदेश जरी करू नये,असे निर्देश दिले आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी प्रकरणावर उद्या दुपारी ३ वाजता सुनावणी होणार असल्याचे सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयात आज हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन (Vishnu Jain) यांनी या प्रकरणावर उद्या सुनावणी घ्यावी अशी विनंती केली होती. तर यूपीचे वकील तुषार मेहता (Tushar Mehata) यांनी लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली होती. यावेळी मुस्लिम समाजाच्या बाजूने ज्येष्ठ वकील हुजेफा अहमदी हे उपस्थित होते. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, देशभरात अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि त्यामुळे यावर आज सुनावणी व्हायला हवी. ट्रायल कोर्टातही आज सुनावणी होणार आहे. यावर न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड (Dhananjaya Y. Chandrachud Judge of Supreme Court of India) म्हणाले की, आम्ही उद्या या प्रकरणावर सुनावणी करू शकतो. परंतु काल आधीच ५० प्रकरणे प्रलंबित आहेत. मला माझ्या सहकारी न्यायाधीशांशी बोलू द्या. यानंतर न्यायाधीशांनी आपापसात चर्चा करून शुक्रवारी सुनावणी घेण्याचे सांगितले.

तर ज्ञानवापी प्रकरणातील सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. दोन पानी अहवालात माजी न्यायालयाचे आयुक्त अजय मिश्रा यांनी हिंदू धर्माची चिन्हे आणि अवशेष शोधण्याचा उल्लेख केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर ६ आणि ७ मे रोजी सर्वेक्षण करण्यात आले. अहवालात अजय मिश्रा यांनी सांगितले की, उत्तरेकडून वादग्रस्त जागेपर्यंतच्या पश्चिमेकडील भिंतीच्या कोपऱ्यावर जुन्या मंदिरांचा ढिगारा दिसत होता, ज्यावर देवता आणि कमळांच्या आकृत्या दिसत होत्या. उत्तर-पश्चिम कोपऱ्यावर वाळू-सिमेंटच्या प्लॅटफॉर्मवर नवीन बांधकाम करण्यात आले आहे.

Advertisements

Related Stories

प्रसूतीसाठी लाच स्वीकारताना ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.संतोष आडगळे ताब्यात

Abhijeet Shinde

ममता बॅनर्जींचा मोठा विजय

Abhijeet Shinde

ओडिशामधील व्यापाऱ्याने बनवला 3.5 लाख रुपयांचा ‘सोन्याचा मास्क’

Rohan_P

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या 11 लाखांच्या उंबरठ्यावर

datta jadhav

नांदेडमधील आश्रमात साधुसह सेवकाची हत्या

datta jadhav

धोनी सर्वात महान कर्णधार :पीटरसन

Patil_p
error: Content is protected !!