गुजरात जायंट्स 3 गडय़ांनी पराभूत, गार्थची कामगिरी वाया, हॅरिस सामनावीर
वृत्तसंस्था/ नवी मुंबई
महिलांच्या पहिल्याच प्रिमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेतील येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात गेस हॅरिस आणि सोफी इक्लेस्टोन यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर युपी वॉरियर्सने शेवटच्या षटकात गुजरात जायंट्सचा 3 गडय़ांनी नाटय़मयरीत्या पराभव करत विजयी सलामी दिली. गुजरात जायंट्सच्या किम गार्थची 5 बळींची कामगिरी वाया गेली. युपी वॉरियर्सच्या नाबाद अर्धशतक झळकविणाऱया ग्रेस हॅरिसला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात जायंट्सने 20 षटकात 6 बाद 169 धावा जमविल्या. त्यानंतर युपी वॉरियर्सने 19.5 षटकात 7 बाद 175 धावा जमवित आपला शानदार विजय नोंदविला. ऑस्ट्रेलियाच्या ग्रेस हॅरिसने संघावर दडपण असतानाही शेवटपर्यंत शांत डोक्मयाने फलंदाजी करत 26 चेंडूत नाबाद 59 धावा फटकावित आपल्या संघाला 1 चेंडू बाकी असताना हा विजय मिळवून दिला. ग्रेस हॅरिसला सोफी इक्लेस्टोनकडून चांगली साथ मिळाली. या जोडीने आठव्या गडय़ासाठी अभेद्य 70 धावांची भागीदारी केवळ 25 चेंडूत नोंदविली. या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून गुजरात जायंट्सला दणदणीत हार पत्करावी लागल्यानंतर केवळ 24 तासांच्या अंतराने गुजरात जायंट्सने आपल्या दुसऱया सामन्यात निश्चितच दर्जेदार कामगिरी केली. पण त्यांना विजयाने हुलकावणी दिली. गुजरात जायंट्सच्या किम गार्थची गोलंदाजी अप्रतिम झाली. तिच्या भेदक गोलंदाजीसमोर युपी वॉरियर्सने पहिल्या 3 षटकात केवळ 20 धावात 3 गडी गमावले होते. विंडीजची अष्टपैलू डॉटिनच्या जागी संघात सहभागी झालेल्या गार्थने युपी वॉरियर्सची आघाडीची फळी झटपट गुंडाळली. तिने या सामन्यात 36 धावात 5 गडी बाद केले. पण तिची ही कामगिरी अखेर वाया गेली.
गुजरात जायंट्सच्या डावाला बऱयापैकी सुरुवात झाली. एस. मेघना आणि डंक्ले यांनी 3.5 षटकात 34 धावा जमविल्या. दीप्ती शर्माने डंक्लेचा त्रिफळा उडविला. तिने 11 चेंडूत 2 चौकारांसह 13 धावा जमविल्या. त्यानंतर इक्लेस्टोनने मेघनाला सेरावतकरवी झेलबाद केले. तिने 15 चेंडूत 5 चौकारांसह 24 धावा जमविल्या. इक्लेस्टोनने गुजरात जायंट्सला आणखी एक धक्का देताना सदरलँडला बाद केले. तिने 1 चौकारासह 8 धावा केल्या. गुजरात जायंट्सची स्थिती यावेळी 7.1 षटकात 3 बाद 50 अशी होती. देवोल आणि सुषमा वर्मा यांनी चौथ्या गडय़ासाठी 26 धावांची भर घातली. मॅकग्राने वर्माला झेलबाद केले. तिने 1 चौकारासह 9 धावा केल्या. देवोल आणि गार्डनर या जोडीने पाचव्या गडय़ासाठी 44 धावांची भागीदारी केली. दीप्ती शर्माने गार्डनरला यष्टीरक्षक हिलीकरवी यष्टीचीत केले. तिने 19 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 25 धावा जमविल्या. देवोल सहाव्या गडय़ाच्या रूपात तंबूत परतली. अंजली सर्वानीने तिला झेलबाद केले. देवोलने 32 चेंडूत 7 चौकारांसह 46 धावा जमविल्या. हेमलता आणि स्नेह राणा यांनी 16 चेंडूत 27 धावांची भर घातल्याने गुजरात जायंट्सने 20 षटकात 6 बाद 169 धावा जमवित युपी वॉरियर्सला विजयासाठी 170 धावांचे आव्हान दिले. गुजरात जायंट्सच्या डावात 2 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. युपी वॉरियर्सतर्फे दीप्ती शर्मा आणि इक्लेस्टोन यांनी प्रत्येकी 2 तर सर्वानी व मॅकग्रा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना युपी वॉरियर्सच्या डावाला डळमळीत सुरुवात झाली. किम गार्थच्या भेदक माऱयासमोर त्यांचे महत्त्वाचे फलंदाज ऍलिसा हिली, सेहरावत आणि ताहिला मॅकग्रा या केवळ 3 षटकात तंबूत परतल्या. गार्थने डावातील तिसऱया षटकातील पहिल्याच चेंडूवर ऍलिसा हिलीला टिपले. तिने 1 चौकारासह 7 धावा जमविल्या. त्यानंतर गार्थने सेहरावतला जोशीकरवी झेलबाद केले. तिने 1 चौकारासह 5 धावा केल्या. गार्थने आपल्या दुसऱया षटकातील 5 व्या चेंडूवर सेहरावतला तर शेवटच्या चेंडूवर मॅकग्राला झेलबाद केले. किरण नवगिरे आणि दीप्ती शर्मा यांनी सावध फलंदाजी करत चौथ्या गडय़ासाठी 9 षटकात 66 धावांची भागीदारी केली. 12 व्या षटकात जोशीने दीप्ती शर्माचा त्रिफळा उडविला. तिने 11 धावा जमविल्या. शर्मा बाद झाल्यानंतर नवगिरे गार्थच्या गोलंदाजीवर वर्माकरवी झेलबाद झाली. नवगिरेने 43 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 53 धावा झळकविल्या. युपी वॉरियर्सने 12.4 षटकात 5 बाद 88 धावा जमविल्या होत्या. याच धावसंख्येवर युपी वॉरियर्सने सिमरन शेख हा गडी गमविला. गार्थने शेखचा खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळा उडविला. सदरलँडने देविका वैद्यला 4 धावांवर झेलबाद केले. युपी वॉरियर्सची यावेळी स्थिती 15.4 षटकात 7 बाद 105 धावा अशी केविलवाणी होती. त्यांना विजयासाठी 4.2 षटकात 64 धावांची जरुरी होती आणि त्यांचे 3 गडी खेळावयाचे होते. ग्रेस हॅरिस आणि सोफी इक्लेस्टोन या जोडीने युपी वॉरियर्सला केवळ 1 चेंडू बाकी ठेवून थरारक विजय मिळवून दिला. ग्रेस हॅरिसने तनुजा कंवरच्या गोलंदाजीवर मिडविकेटच्या दिशेने उत्तुंग षटकार ठोकला. युपी वॉरियर्सच्या डावातील गार्थने आपल्या शेवटच्या षटकात 20 धावा दिल्या. हॅरिस आणि इक्लेस्टोन यांनी या षटकात 4 चौकार ठोकले. युपी वॉरियर्सला शेवटच्या 2 षटकात विजयासाठी 33 धावांची जरुरी होती. इक्लेस्टोनने गार्डनरच्या षटकात 1 षटकारासह 14 धावा घेतल्या. युपी वॉरियर्सच्या डावातील हे 19 वे षटक होते. गुजरात जायंट्सने शेवटचे षटक टाकण्यासाठी सदरलँडकडे चेंडू सोपविला. या षटकात युपी वॉरियर्सला 19 धावांची जरुरी होती. हॅरिसने या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला. युपी वॉरियर्सला शेवटच्या 4 चेंडूत विजयासाठी 10 धावा जमविणे जरुरीचे होते. हॅरिसने सदरलँडच्या बाहेर जाणाऱया चेंडूवर चौकार ठोकला. सदरलँडचा हा चेंडू वाईड असल्याचे दिसून आले. पण पंचांनी वाईडचा निर्णय न दिल्याने रिव्हय़ू घेण्यात आला. हा रिव्हय़ू युपी वॉरियर्सच्या बाजूने अनुकूल ठरला. त्यानंतर हॅरिसने पुढील चेंडूवर 1 चौकार आणि पाचव्या चेंडूवर विजयी षटकार ठोकून गुजरात जायंट्सचे आव्हान संपुष्टात आणले. युपी वॉरियर्सच्या डावात 6 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. गुजरात जायंट्सतर्फे गार्थने 36 धावात 5 तर सदरलँड आणि मानसी जोशी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
गुजरात जायंट्स 20 षटकात 6 बाद 169 (मेघना 24, डंक्ले 13, देवोल 46, सदरलँड 8, सुषमा वर्मा 9, गार्डनर 25, हेमलता नाबाद 21, स्नेह राणा नाबाद 9, अवांतर 14, दीप्ती शर्मा 2-27, इक्लेस्टोन 2-25, सर्वानी 1-43, मॅकग्रा 1-18), युपी वॉरियर्स 19.5 षटकात 7 बाद 175 (हिली 7, सेहरावत 5, किरण नवगिरे 53, मॅकग्रा 0, दीप्ती शर्मा 11, ग्रेस हॅरिस नाबाद 59, शेख 0, देविका वैद्य 4, इक्लेस्टोन नाबाद 22, अवांतर 14, किम गार्थ 5-36, सदरलँड 1-41, मानसी जोशी 1-15).