Tarun Bharat

तवांग प्रश्नावर पुन्हा संसदेत गदारोळ

मेगॅसिस मुद्दाही उपस्थित, अमित शाह यांनी विरोधकांना फटकारले

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

तवांगमध्ये नुकत्याच झालेल्या भारत आणि चिनी सैनिकांच्या झटापटीसंबंधी संसदेत चर्चा करण्यास सरकार अनुमती देत नाही, असा आरोप करत काँगेस नेत्या सोनिया गांधी आणि इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गदारोळ केला आहे. बुधवारी यासंबंधी प्रश्नोत्तर कालापासूनच विरोधकांचा गोंधळ सुरु होता.

नंतर विरोधकांनी संसदेतून सभात्याग करुन गांधी पुतळय़ाजवळ सरकारच्या विरोधात धरणे धरले. या आंदोलनाचे नेतृत्वही सोनिया गांधी यांनी पेले होते. काँगेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील काँगेस नेते अधीररंजन चौधरी आदी नेते या धरणे कार्यक्रमात समाविष्ट होते. त्याशिवाय सीपीआय, सीपीआयएम, राजद, संजद, शिवसेना, द्रमुक आणि राष्ट्रवादी काँगेस यांच्यासह 12 विरोधी पक्षांचे नेतेही या धरणे आंदोलनात सामील झाले होते. त्यांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या.

पंतप्रधानांनी उत्तर द्यावे

चीनने केलेल्या घुसखोरी संदर्भात सरकारने विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावयास हवीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः संसदेत निवेदन करुन सीमेवरील स्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली. याप्रकरणी अनेक विरोधी पक्षांनी लोकसभेत आणि राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे. तथापि, सरकारने हे प्रस्ताव मानण्यास नकार दिला आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे.

मेगॅससचा मुद्दा उपस्थित

केंद्र सरकारने पेगॅसस या इस्रायली सॉफ्टवेअरचा उपयोग हेरगिरी करण्यासाठी केल्याचा कोणताही निर्णायक पुरावा चौकशीत सापडलेला नाही, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला असूनही लोकसभेत बुधवारी हा मुद्दा काँगेसचे खासदार गौरव गोगोई यांनी उपस्थित केला. पेगॅससचा उपयोग करुन केंद्र सरकार देशातील विचारवंत, पत्रकार आणि विरोधी पक्षाचे नेते यांच्यावर हेरगिरी करत आहे. या सॉफ्टवेअरचा उपयोग करुन केंद्र सरकारने किती अमली पदार्थ तस्कर पकडले, असा प्रश्न गोगोई यांनी केला. सरकार या सॉफ्टवेअरचा उपयोग केवळ आपल्या विरोधातील व्यक्तींविरोधात करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.

अमित शाह यांचे जोरदार प्रत्युत्तर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गोगोई यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर सरकारच्या वतीने दिले. सर्वोच्च न्यायालयाने या हेरगिरी प्रकरणात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. पेगॅससचा उपयोग केंद्र सरकारने केल्याचा पुरावा नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले असूनही विरोधी पक्षनेते हा प्रश्न उपस्थित करीत आहेत. विरोधकांजवळ अशा उपयोगाचे पुरावे असतील तर ते त्यांनी सादर करावेत. बाष्कळ आणि पोकळ आरोप करुन सदनाचा वेळ वाया घालवू नये. हे सदन अशा निरर्थक आणि बिनबुडाच्या आरोपांवर चर्चा करण्यासाठी नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी गोगोई यांनी फटकारले. गोगोई यांनी चीनच्या कथित घुसखोरीचा मुद्दाही उपस्थित केला. सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप त्यांनी केला. शाह यांनी हा आरोपही फेटाळत नेहरुंच्या नेतृत्वात भारताचा युद्धात चीनकडून पराभव झाला होता, याची आठवण करुन दिली.

Related Stories

लेफ्ट. जन. राज शुक्ला युपीएससीचे सदस्य

Patil_p

देशात कोरोनाचा पाचवा बळी

tarunbharat

‘कृषी सन्मान’चे दोन हजार आज शेतकऱयांच्या खात्यात

Amit Kulkarni

नाराजी, धार्मिक धुवीकरण – तृणमूलसमोरील आव्हाने

Patil_p

देशात 24 तासात कोरोनाचे 4187 बळी

datta jadhav

तीन दिवसांनी पुन्हा पेट्रोल-डिझेल वधारले

Amit Kulkarni