ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Urgent tender for 62,500 bulletproof jackets from Army दहशतवाद्यांकडून सध्या जॅकेट छेदणाऱ्या बुलेटचा वापर होत आहे. त्यामुळे जवानांच्या सुरक्षिततेसाठी लष्कराने 62,500 बुलेटप्रूफ जॅकेटची तातडीची निविदा काढली आहे. लष्कराच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात ट्विट केले आहे.
संरक्षण मंत्रालयाने मेक इन इंडिया’ अंतर्गत बुलेटप्रूफ जॅकेटसाठी दोन स्वतंत्र टेंडर काढले आहेत. यामध्ये 47 हजार 627 जॅकेटसाठी जनरल निविदा तर 15 हजार जॅकेटसाठी आणीबाणीच्या खरेदी प्रक्रियेंतर्गत निविदा काढली आहे. यामध्ये बीपीजी 7.62 मिमी आर्मर पीअरिंग रायफल आणि 10 मीटर अंतरावरुन गोळीबार केल्यास स्टील कोअर बुलेटपासून सैनिकांचं रक्षण होणार आहे. केवळ भारतात बनवल्या जाणाऱ्या जॅकेटचीच लष्कर खरेदी करणार आहे.
अधिक वाचा : राज्यपालांनी पदावर राहण्याबाबत पुनर्विचार करावा, अजित पवार संतप्त