Tarun Bharat

पूर आलेल्या गावांमध्ये तातडीने स्वच्छता मोहीम राबवा

Advertisements

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे निर्देश

प्रतिनिधी/कोल्हापूर

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांमध्ये यावेळीही पुराचे पाणी आले. त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची छोटी डबकी तयार झाली आहेत. यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यासाठी तातडीने स्वच्छता मोहीम राबवण्याबरोबरच औषध फवारणी करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी गुरुवारी येथे संबंधित यंत्रणेला दिले.

जिल्हा परिषदेत आयोजित आरोग्य समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. संजयसिंह चव्हाण म्हणाले, लिंग गुणोत्तरांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे तेथील सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्याचे संबंधित यंत्रणेला दिले आहेत. सोनोग्राफी सेंटरच्या प्रतीक्षा कक्षामध्ये सीसीटीव्ही बसवण्या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनाही आवश्यक त्या सुचना दिल्या आहेत.

ते पुढे म्हणाले बैठकीत लॅप्टो स्पायरोसिसबाबत चर्चा करण्यात आली. गाव पातळीवर अंशकालीन अर्धवेळ परिचारीका म्हणून काम करणाया महिलांना दोन साडय़ा देण्यासाठी त्यांच्या बँक खात्यावर एक हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर जिल्हा क्षयरोग आणि कुष्ठ रोग मुक्त करण्यासाठी 13 सप्टेंबर पासून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हा शंभर टक्के क्षयरोग आणि कुष्ठरोगमुक्त करण्याबाबत संबंधित यंत्रणेला निर्देश देण्यात आले आहेत.

Related Stories

पैसे दिले न दिल्याच्या कारणावरुन दापोलीत युवकावर ब्लेडने वार; तीघांवर गुन्हा दाखल

Sumit Tambekar

शाहूवाडीत सापडला अजून एक कोरोना रुग्ण

Abhijeet Shinde

`’कपिलतीर्थ’ जवळील जागेत होणार अन्नछत्र

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कागल तालुक्यात कोरोनाचे नवे ४२ रुग्ण

Abhijeet Shinde

घुणकी येथील अपघातात एक ठार एक जखमी

Abhijeet Shinde

डफावर थाप पडण्यापूर्वीच शाहिरांनी घेतला जगाचा निरोप

Abhijeet Shinde
error: Content is protected !!