बॉलीवूडची स्टार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने मंगळवारी जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत हजेरी लावली. भारत जोडो यात्रेत शेवटच्या टप्प्यात असताना तीने राहुल गांधींबरोबर चालून यात्रेत सहभाग घेतला.
“जेव्हा तारे आपल्याबरोबर असतात तेव्हा, यात्रेचा प्रवास उजळ होतो” असे कॉंग्रेस पक्षाने ट्विट केले आहे. सप्टेंबरपासून चालू असलेल्या कॉंग्रेसच्या पदयात्रेत अनेक बॉलीवूडमधील अनेक सेलीब्रेटिंनी सहभाग दर्शिवला आहे. यापुर्वी अभिनेत्री पूजा भट्ट, कमल हसन, आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासह अनेक दिग्गज राहुल गांधींसोबत यात्रेत चालले आहेत.
हेही वाचा >>> मिस्टर पोपटलाल यांना लवकरच नोटीस काढणार -संजय राऊत
या संदर्भातील व्हिडीओ उर्मिला मातोंडरने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये उर्मिला राहूल गांधींसोबत चालताना दिसत आहे. “एकता, आत्मीयता, समानता आणि बंधुतासाठी चाला” असे तिने या व्हिडीओबरोबर ट्विट केले आहे.
मोर्चा सहभागी होण्यापूर्वी तिने एक व्हिडिओ संदेश पोस्ट केला होता. या व्हिडीओत ती म्हणते “या थंडीच्या दिवसात, मी तुमच्याबरोबर जम्मूमधून बोलत आहे. आतापासून थोड्याच वेळात, मी यात्रेत सामील होणार आहे. भारताची एकात्मता हा यात्रेचा आत्मा आहे. आपण सर्वांनी हा भारत घडवला आहे. ही यात्रा माझ्यासाठी राजकारणापेक्षा समाजकारणासाठी आहे. जग प्रेमाने चालते, द्वेषाने नाही,” असे तीने या व्हि़डिओ क्लिपमध्ये म्हटले आहे.