Tarun Bharat

ओटीटीवर पदार्पण करणार उर्मिला

Advertisements

‘तिवारी’ वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिकेत

दीर्घकाळानंतर बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा अभिनयाच्या जगतात पाऊल ठेवणार आहे. सौरभ वर्मा यांचा आगामी वेबसीरिज ‘तिवारी’मधून उर्मिला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर या सीरिजचे पोस्टर शेअर केले आहे. यात उर्मिला ऍक्शनदृश्ये करताना दिसून येणार आहे.

‘तिवारी’ वेबसीरिजद्वारे स्वतःचे पुनरागमन आणि डिजिटल पदार्पण करणार आहे. हे सर्व चाहत्यांच्या प्रेमामुळेच शक्य झाले आहे. ही सीरिज सर्वांना आवडणार अशी अपेक्षा आहे. माझ्या नव्या प्रवासासाठी सर्वांचे प्रेम आणि शुभेच्छांची गरज असल्याचे उर्मिलाने म्हटले आहे. उर्मिलाची ही सीरिज ‘आई आणि मुलाच्या’ नात्यावर आधारित आहे.

‘तिवारी’पूर्वी मला अनेक ऑफर्स मिळाल्या होत्या, परंतु मी घाई करू इच्छित नव्हते. आम्ही भोपाळमध्ये याचे चित्रिकरण करणार आहोत असे उर्मिलाने सांगितले आहे. उर्मिलाने मागील 5-7 वर्षांमध्ये 50 हून अधिक पटकथा नाकारल्या होतय. उर्मिलाने माझ्या सीरिजमध्ये काम करण्यास होकार दिल्याने मी आनंदी झालो होतो. सत्या आणि एक हसीना थी या चित्रपटांमधील तिचे काम अत्यंत वाखाणण्याजोगे होते असे दिग्दर्शक सौरभ वर्माने सांगितले आहे.

Related Stories

मनी हाइस्ट’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

Patil_p

अंजिनी धवन करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

Amit Kulkarni

क्रिती सेननला बॉलिवूडमध्ये 7 वर्षे पूर्ण

Patil_p

अब्दुल करीम तेलगीवर वेबसीरिज

Amit Kulkarni

झुंड चित्रपटातील ‘या’ कलाकाराला चोरीच्या आरोपाखाली अटक

Archana Banage

ओह माय घोस्टमध्ये प्रथमेश परब

Patil_p
error: Content is protected !!