28 वर्षांतील सर्वात मोठी वाढ : भारतावरही परिणाम शक्य
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेची केंद्रीय बँक, यूएस फेड रिझर्व्हने 28 वर्षांतील सर्वात मोठी व्याजदर वाढ केली आहे. महागाई नियंत्रित करण्यासाठी फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 75 बेस पॉईंट्स किंवा 0.75 टक्क्मयांपर्यंत वाढ केली आहे. अमेरिकन सेंट्रल बँकेने नोव्हेंबर 1994 मध्ये व्याजदरात इतकी मोठी वाढ केली होती. व्याजदरात 0.75 टक्क्मयांनी झालेली वाढ ही 1994 नंतरची सर्वाधिक आहे. यूएस फेडच्या व्याजदरात वाढ झाल्यामुळे भारतीय चलनावर संकटाचे ढग दाटून आले आहेत. सध्या अमेरिकेतील महागाईने 40 वर्षांतील उच्चांक गाठला आहे. मे महिन्यात महागाईचा दर 8.6 टक्के होता. अशा परिस्थितीत अमेरिकेच्या सेंट्रल बँकेने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
व्याजदर वाढल्याने डॉलर मजबूत होईल, परंतु रुपयाचे आणखी अवमूल्यन होऊ शकते. डॉलरच्या तुलनेत रुपया आधीच नीचांकी पातळीवर आहे. परकीय चलन बाजारात बुधवारी रुपया 18 पैशांनी घसरून अमेरिकन चलनाच्या तुलनेत 78.22 या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला. यूएस फेडच्या बैठकीपूर्वी, व्याजदरात वाढ होण्याच्या अंदाजामुळे जगभरातील शेअर बाजारात घसरण झाली होती.
भारतावर काय परिणाम होईल?
यूएस फेडच्या व्याजदरात वाढ झाल्यामुळे डॉलर मजबूत झाल्यामुळे रुपयाचे आणखी अवमूल्यन होऊ शकते. आधीच रुपया 78 च्या पुढे गेला आहे. अशा स्थितीत रुपयामध्ये आणखी घसरण पाहायला मिळू शकते. तसेच फेडच्या निर्णयामुळे डॉलर मजबूत झाला तर सोन्याचे भाव कमी होतील. त्याचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून येईल.