Tarun Bharat

अमेरिकेच्या अध्यक्षांची बंदुक नियंत्रण विधेयकावर स्वाक्षरी

Advertisements

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी बहुचर्चित आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या बंदुक नियंत्रण विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. यामुळे अमेरिकेमध्ये फोफावलेल्या गण कल्चरला काही प्रमाणात तरी आळा बसेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. हे विधेयक काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या वरिष्ठ सभागृहाने संमत केले होते.

अमेरिकेत बंदुक किंवा शस्त्र मिळविण्यासाठी फारसे प्रयास करावे लागत नाहीत. शस्त्रविक्री येथे कायदेशीर असून ती खुलेआम चालते. दरवर्षी 4 कोटी गन्स खपतात, असे सांगितले गेले आहे. यामुळे या शस्त्रांचा दुरुपयोगही मोठय़ा प्रमाणावर वाढला असून अनेक हत्याकांडे घडली आहेत. या हत्याकांडांमध्ये अनेक बालके बळी पडली आहेत. त्यामुळे लोकांची शस्त्र खरेदी प्रक्रिया जटील व्हावी या हेतूने हे विधेयक मांडण्यात आले होते. अमेरिकेतील शस्त्रव्यापार जवळपास 10 हजार कोटी डॉलर्स इतका मोठा असल्याचेही सांगण्यात येते.

हे विधेयक अद्यापही फारसे कठोर नाही असे अमेरिकेतील डेमोक्रेटिक पक्षाचे मत आहे. बायडेन याच पक्षाचेच आहेत. तथापि कठोर बंदुक नियंत्रक कायदा ज्येष्ठ सभागृहात संमत करून घेणे अमेरिकेला जमलेले नाही. परिणामी या विधेयकावरही तज्ञांची कडाडून टीका होणे शक्य आहे.

Related Stories

किंडरगार्टनमध्ये माथेफिरूचा चाकू हल्ला, 3 ठार

Patil_p

हायड्रॉक्सी क्लोरोक्विनला ‘संजीवनी बूटी’ची उपमा

Patil_p

सर्वात भव्य वाचनालय

Amit Kulkarni

अमेरिकेत ऑक्सफर्डच्या लसीची मानवी चाचणी थांबवली

datta jadhav

सुरक्षा परिषदेत भारताचा पाकवर हल्लाबोल

Patil_p

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पाक पंतप्रधानांना जामीन

Patil_p
error: Content is protected !!