Tarun Bharat

अमेरिकेचे अध्यक्ष दक्षिण कोरिया दौऱयावर

वृत्तसंस्था/ सोल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन सध्या दक्षिण कोरियाच्या दौऱयावर असून दक्षिण कोरिया आणि जपान यांच्याशी मैत्रीचे संबंध दृढतर करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत, असे अमेरिकन प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दक्षिण चीन समुद्र, प्रशांत महासागरीय क्षेत्र व त्या भागातील अमेरिकेचे हितसंबंध जपण्यासाठी त्यांची ही दक्षिण कोरिया भेट महत्त्वाची असल्याचे मानण्यात येत आहे. चीनने या क्षेत्रात मोठे आव्हान उभे केले असून त्याला एकत्रितरीत्या प्रतिकार करण्यासाठी धोरण ठरविण्याचे काम या दौऱयात केले जाईल, अशी शक्मयता आहे.

Advertisements

जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यात सध्या संबंध ताणले गेले आहेत. हे दोन्ही अमेरिकेचे मित्रदेश असल्याने त्यांच्यातील वाद अमेरिकेच्या हितसंबंधांना बाधक ठरू शकतो. म्हणून हे मतभेद मिटविण्याच्या दृष्टीनेही बायडेन या दौऱयात प्रयत्न करतील. युपेन युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा केली जाईल, अशी माहिती व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने पत्रकारांना दिली आहे.

Related Stories

तीन अमेरिकनांना अर्थशास्त्राचे नोबेल

Patil_p

स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात; 49 ठार, 58 जण जखमी

datta jadhav

बिलावल भुट्टो पाकिस्तानचे नवे विदेशमंत्री

Patil_p

लेबनॉनमध्ये बिघडलेल्या आर्थिक व्यवस्थेविरुद्ध जनतेचा आक्रोश

Patil_p

बलूच आंदोलन संपविण्यासाठी चीनकडून रसद

Patil_p

लसनिर्मितीत महिला वैज्ञानिक आघाडीवर

Patil_p
error: Content is protected !!