Tarun Bharat

तैवानच्या सामुद्रधुनीत अमेरिकेच्या युद्धनौका

चीनच्या संतापात मोठी भर

वृत्तसंस्था/ तैपैई

अमेरिकेच्या नौदलाच्या दोन युद्धनौकांनी तैवान सामुद्रधुनीत प्रवश केला आहे. अमेरिकेतील प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱयानंतर चीनने या सामुद्रधुनीत अभूतपूर्व सैन्याभास केला होता.

अमेरिकेच्या मिसाइल क्रूजर युएसएस एंटियेटम अन् युएसएस चांसलर्सविले या  युद्धनौकांनी तैवानच्या सामुद्रधुनीत प्रवेश केला आहे. या सागरी क्षेत्रात नेव्हिगेशन अन् ओव्हरफ्लाइटचे स्वातंत्र्य आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार लागू होते असे अमेरिकेच्या 7 व्या फ्लीटने रविवारी म्हटले आहे.

या युद्धनौका सामुद्रधुनीत कुठल्याही किनारी भागापासून दूर प्रवास करत आहेत. तैवान सामुद्रधुनीच्या माध्यमातून युद्धनौकांचा प्रवास एक स्वतंत्र आणि खुल्या हिंद-प्रशांतसाठी अमेरिकेची प्रतिबद्धता दर्शवित असल्याचे 7व्या फ्लीटकडून नमूद करण्यात आले.

10 मैल लांबीची सामुद्रधुनीच तैवानला चीनपासून वेगळे करते. या बेटसदृश देशावर कधीच नियंत्रण मिळविता आले नसतानाही चीनचा सत्तारुढ कम्युनिस्ट पक्ष तैवानवर दावा करण्यास सामुद्रधुनीला स्वतःच्या जलक्षेत्राचा हिस्सा मानतो. तर सामुद्रधुनीचा बहुतांश भाग हा आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात असल्याचे अमेरिकेच्या नौदलाचे म्हणणे आहे.

अमेरिकेतील सिनेटर मार्शा ब्लॅकबर्न यांनी शुक्रवारी तैवानचा दौरा केल्यावर चीनने या देशाच्या आसपास सागरी तसेच हवाई क्षेत्रात युद्धाभ्यास सुरू केला आहे. तैवानच्या भोवताली चिनी नौदलाच्या 8 युद्धनौका तसेच 36 लढाऊ विमाने घिरटय़ा घालत असल्याचे समोर आले होते.

Related Stories

काश्मीर मुद्दा उपस्थित करणे पाकच्या अंगलट

Patil_p

कृषी कायद्यांविषयी देशभरात जनजागृती करणार : राकेश टिकैत

datta jadhav

राज्यपालांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर खा. उदयनराजे यांची पहिली प्रतिक्रिया

Abhijeet Khandekar

सीबीएसई दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Patil_p

खाद्यतेल अधिकच होणार महाग

Patil_p

गाझियाबाद प्रकरणी ट्विटरने अंग झटकले

Patil_p