Tarun Bharat

टेक्सासजवळ एकाच ट्रकामध्ये आढळले तब्बल 40 स्थलांतरितांचे मृतदेह

Advertisements

ऑनलाईन टिम नवी दिल्ली

अमेरिकेतील टेक्सास राज्यातील सॅन अँटोनियो या शहराबाहेर, एका ट्रॅक्टर-ट्रेलरमध्ये तब्बल 40 स्थलांतरीत लोक मृतावस्थेत आढळले आहेत. टेक्सासमधील एका उच्च अधिका-यांच्या गटाने या प्रकरणाची माहिती दिली.

सॅन अँटोनियोतील एका स्थानिक टिव्ही चॅनेल या बाबतचे वृत्त प्रथम दिले. शहराच्या दक्षिणेला दुर्गम भागात हा ट्रक रेल्वे रुळाशेजारी सापडला. दक्षिण टेक्सासमध्ये स्थलांतरित लोक अमेरिकेत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. पण ट्रेलरमध्ये त्यांचा गुदमरून मृत्यु झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये 42 लोकांचा मृत्यू झाल्याचे कळत आहे. या स्थलांतरितांची राष्ट्रियत्व अजून उघड झाली नाहीत.

दरम्यान, मेक्सिकन परराष्ट्र मंत्री मार्सेलो एब्रार्ड यांनी सांगितले की, मेक्सिकन परराष्ट्र अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन याचा आढावा घेतला आहे. एब्रार्ड यांनी ट्विटर द्वारे पीडितांविषयी आदरांजली वाहिली आहे.

Related Stories

वाई तालुक्यातील शिरगाव येथील केळी बागांचे लाखो रुपयांचे नुकसान

Patil_p

आमदारांच्या त्यागपत्रांवर त्वरित निर्णय घ्या !

tarunbharat

विदेशी चलन साठा उच्चांकी स्तरावर

Patil_p

आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्यांनी पुढे येऊन नावे नोंदवावीत

Abhijeet Shinde

हरिद्वार धर्म संसदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी यति नरसिंहानंद अटकेत

Abhijeet Shinde

पीककर्जापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – सहा. निबंधक अभय कटके

Abhijeet Shinde
error: Content is protected !!