Tarun Bharat

जनावरांच्या अंगावर मच्छरदाणीचा वापर

Advertisements

लम्पीपासून दूर ठेवण्यासाठी शेतकऱयांची धडपड : पशुसंगोपन खात्यामार्फत रोग नियंत्रणासाठी गावोगावी जनजागृती

प्रतिनिधी /बेळगाव

लम्पी रोगाची लागण होऊ नये, यासाठी शेतकरी जनावरांची काळजी घेताना दिसत आहेत. डास, माशा, गोचिड, चिलटे आदींपासून या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी चक्क जनावरांच्या गोठय़ात मच्छरदाणीचा वापर वाढला आहे. रोगापासून पशुधनाला वाचविण्यासाठी शेतकऱयांची धडपड पाहायला मिळत आहे.

लम्पी या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढला आहे. आतापर्यंत हजारो जनावरांना लागण झाली आहे. शेकडो जनावरे दगावली आहेत. त्यामुळे पशुपालकांची चिंता वाढली आहे. जनावरे दगावलेल्या शेतकऱयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. केवळ तालुक्मयाच्या पूर्व भागात असलेला हा रोग सर्वत्र पसरला आहे. बाधित जनावराला चावलेल्या डास, माशा, गोचिड, चिलटे निरोगी जनावराला चावल्यास या रोगाची लागण होते. त्यामुळे खबरदारी म्हणून काही पशुपालकांनी जनावरांच्या अंगावर मच्छरदाणीचा वापर केला आहे.  पशुसंगोपन खात्यामार्फत रोग नियंत्रणासाठी गावोगावी जनजागृती केली जात आहे. बाधित जनावराला स्वतंत्र बांधा, गोठय़ात धूर आणि मच्छरदाणीचा वापर करा, जनावरे चारण्यासाठी-धुण्यासाठी बाहेर सोडू नका, असे आवाहन खात्यामार्फत केले जात आहे. याची दखल घेत काही शेतकऱयांकडून खबरदारी म्हणून आपल्या गोठय़ात मच्छरदाणीचा वापर केला जात आहे.

बेळगाव आणि सौंदत्ती तालुक्मयात लम्पिस्कीनची लागण झालेल्या जनावरांची संख्या अधिक आहे. दरम्यान, हा संसर्गजन्य रोग बाधित जनावरांपासून निरोगी जनावराकडे तात्काळ फैलावतो. विशेषतः गाय आणि बैलांमध्ये या रोगाची लागण अधिक आहे. दुभत्या गायीदेखील मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱयांना फटका बसला आहे. यासाठी खबरदारी म्हणून काही शेतकऱयांनी आपल्या गोठय़ात जनावरांसाठी मच्छरदाणीची व्यवस्था केली आहे.

स्वयंसेवी संघटनांचा पुढाकार

लम्पीचा प्रसार थांबविण्यासाठी गोठय़ात मच्छरदाणीचा वापर गरजेचा आहे. यासाठी स्वयंसेवी संघटनांनी पुढाकार घेतला आहे. या संघटना जनजागृती, औषध फवारणी आणि इतर मदत करीत आहेत. शेतकऱयांना मच्छरदाणी देऊन सहकार्य करीत आहेत. शेतकऱयांनी आपल्या गोठय़ात मच्छरदाणीचा वापर करावा.

– डॉ. आनंद पाटील (तालुका पशुवैद्यकीय अधिकारी)

Related Stories

धाक दाखवून व्यापाऱयाला पावणेतीन लाखाला लुटले

Patil_p

वेटलिफ्टर अक्षता कामतीला खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्ण

Amit Kulkarni

अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त जागा भरा

Amit Kulkarni

जिल्हाधिकारी आर.व्यंकटेशकुमार यांची बदली

Patil_p

शांताई आणि क्रीश फौंडेशन तर्फे डॉ.भूषण सुतार यांचा सत्कार

Tousif Mujawar

नाव नोंदविण्यासाठी परप्रांतीयांची मनपाकडे धाव

Patil_p
error: Content is protected !!