Tarun Bharat

राजभवनच्या निधीचा वापर हा फक्त जनतेच्या सेवेसाठी

राज्यपाल पिल्लई यांचे स्पष्टीकरण

प्रतिनिधी /पणजी

मी राजभवनचा निधी गरजू लोकांसाठी, जनतेच्या सेवेसाठी वापरतो. एक सामाजिक दायित्त्वचे कर्तव्य मी पार पाडत आहे. राजभवनचा निधी हा रुग्णांसाठी वापरला जात आहे. मागील वर्षी पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त विविध संस्थांना निधी वितरित करण्यात आला आहे. आता तर प्रत्येक गावात जाऊन हा निधी मी वैयक्तिकरित्या वितरित करतो. आतापर्यंत अनेक अनाथालय, विविध संस्था, एचआयव्ही एड्स रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. आम्ही जनतेचे सेवक आहोत. जनता ही सर्वोच्च आहे असे प्रतिपादन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोवा माहिती आयोगाच्यावतीने दोनापावला येथील द इंटरनॅशनल सेंटर ऑफ गोवा येथे आयोजित केलेल्या माहिती अधिकार कायदाविषयी परिषदेत बोलताना केले.

यावेळी व्यासपीठावर गोवा सार्वजनिक प्रशासन आणि ग्रामीण संस्था एला फार्म, ओल्ड गोवाचे मुख्य सचिव डॉ. पुनीतकुमार गोयल आयएएस, गोवा राज्य माहिती आयोगाचे राज्य प्रमुख माहिती आयुक्त ऍड. विश्वास सतरकर, माहिती आयुक्त संजय ढवळीकर, गोवा सार्वजनिक प्रशासन आणि ग्रामीण संस्थेचे प्रधान सचिव व महासंचालक डॉ. व्ही कॅन्डाव्ल्यू आयएएस, माहिती व प्रसिद्धी खात्याचे सचिव सुभाष चंद्रा आयएएस व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.

आपला देश हा जगात जास्त लोकशाही असलेला देश म्हणून ओळखला जातो. कुठलेही कायदे असो ते जनतेवर अवलंबून असतात. त्या कायद्याकडे जनता कशाप्रकारे पाहते आणि त्याप्रमाणे गरजा ठरविल्या जातात. माहिती अधिकार कायदा हा एक क्रांतीकारी कायदा आहे. माहिती हक्क हा एक जनतेसाठी मूलभूत हक्क बनला आहे. कायद्याचा एक भाग किंवा सरकारतर्फे अवलंबलेले एक धोरण हे जनतेच्या यशावर अवलंबून असते. असे राज्यपालांनी सांगितले.

 माहिती अधिकार कायदा आल्यानंतर याविषयी सर्वांना सूचना देण्यात आल्या होत्या. आता या कायद्याविषयी सर्वांना माहिती आहे. प्रत्येकजण माहिती मिळविण्यासाठी या कायद्याचा वापर करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने या कायद्याचा सन्मान करणे आवश्यक आहे. देशात सर्व राज्यांना हा कायदा स्वीकारला आहे. सर्व खात्याच्या प्रमुखांनी हा कायदा गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. सर्व खात्याच्या वेबसाईट लवकरात लवकर अपडेट करा असे आवाहन गोवा सार्वजनिक प्रशासन आणि ग्रामीण संस्था एला फार्म, ओल्ड गोवाचे मुख्य सचिव डॉ. पुनीतकुमार गोयल आयएएस यांनी यावेळी केले.

यावेळी प्रमुख माहिती आयुक्त ऍड. विश्वास सतरकर यांचे भाषण झाले. उपस्थितांचे स्वागत गोवा सार्वजनिक प्रशासन आणि ग्रामीण संस्थेचे प्रशिक्षण संचालक मायकल डिसोझा आयएएस यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी केले तर आभारप्रकटन संजय ढवळीकर यांनी केले.

Related Stories

सीमांवर चाचणी सुरु, कर्फ्यू वाढणार

Amit Kulkarni

भारताला विश्व गुरु बनवण्यासाठी पंतप्रधानांना साथ द्या

Omkar B

नोकरीसाठी पैसे घेणाऱया आमदारांची न्यायालयाने दखल घ्यावी

Amit Kulkarni

मडगाव नगरपालिकेचे दयनीय वाहन व्यवस्थापन पुन्हा उघड

Amit Kulkarni

आधी हॉटमिक्सिंग नंतर भूमीगत केबलिंग!

Amit Kulkarni

कर्नाटकातून आडमार्गाने गोव्यात येणाऱयांची सरकारकडून गंभीर दखल

Omkar B