Tarun Bharat

परीक्षेत कॉपीसाठी स्मार्टवॉचचा वापर

Advertisements

गोकाक येथील घटना, तरुणाला अटक

प्रतिनिधी/बेळगाव

पोलीस उपनिरीक्षक भरतीसाठी झालेल्या परीक्षेतील गोलमाल प्रकरण ताजे असतानाच असाच आणखी एक प्रकार घडला आहे. गेल्या रविवार दि. 7 ऑगस्ट रोजी झालेल्या केपीटीसीएलच्या कनिष्ठ साहाय्यक पदांसाठीच्या परीक्षेत स्मार्टवॉच वापरणाऱया एका तरुणाला गोकाक पोलिसांनी अटक केली आहे.

केपीटीसीएलमध्ये रिक्तपदे भरण्यासाठी रविवारी लेखी परीक्षा झाली. गोकाक येथील जेएसएस कॉलेज परीक्षा केंद्रावर परीक्षा देताना सिद्धाप्पा मदीहळ्ळी (वय 20, रा. नागनूर, ता. मुडलगी) याने आपल्या हातात स्मार्टवॉच बांधले होते. या वॉचच्या माध्यमातून प्रश्नपत्रिकेचे फोटो घेऊन तो बाहेर पाठवत होता.

बाहेरून त्याला मिळणारी उत्तरे तो उत्तरपत्रिकेत लिहित होता. परीक्षा केंद्रात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयात हा प्रकार आढळून आला आहे. त्यानंतर परीक्षा केंद्रातील अधिकाऱयांनी गोकाक शहर पोलीस स्थानकात यासंबंधी फिर्याद दिली असून पोलिसांनी सिद्धाप्पाला अटक केली आहे.

यासंबंधी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी माहिती दिली आहे. सध्या स्मार्टवॉच बांधून परीक्षा लिहिणाऱया तरुणाला अटक करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून तो कोणाला पाठवित होता, याचा तपास करण्यात येत आहे. यासाठी दोन स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी पोलीस भरती परीक्षेतही गोकाक तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार झाले होते. केवळ गोकाकच नव्हे तर बेळगावसह राज्यातील वेगवेगळय़ा परीक्षा केंद्रांवर गोकाक तालुक्मयातील काही परीक्षार्थींना अटक झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक परीक्षा घोटाळय़ातही गोकाक तालुक्मयातील काही नावे चर्चेत आहेत.

Related Stories

बसस्थानक आणि बसथांबे नेमके कुणासाठी?

Patil_p

अबब… स्मार्ट सिटी करणार 60 कोटीचे पेव्हर्स ब्लॉकचे रस्ते

Patil_p

म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांच्या खटल्याची

Patil_p

येळ्ळूर परिसरात भातांवर मावा रोगाचा प्रादुर्भाव

Patil_p

बळी नका जाऊ, शेतात राबून खाऊ!

Amit Kulkarni

गॅरेज कॅफेमध्ये उद्यापासून आर्ट क्राफ्ट-म्युझिक मेळय़ाचे आयोजन

Omkar B
error: Content is protected !!