Tarun Bharat

पाणीपातळी घटली, पाणी जपून वापरा

एलऍण्डटी कंपनीचे जनतेला आवाहन :  3 ते 4 दिवसांआड पाणीपुरवठा

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

शहरवासियांची तहान भागविणाऱया राकसकोप जलाशयातील पाणीसाठा कमी झाला आहे. केवळ 10 ते 15 दिवस पुरेल इतका पाणीसाठा असल्याने पाणीपातळीत वाढ होईपर्यंत पाणीपुरवठय़ात कपात करण्याचा निर्णय एलऍण्डटी कंपनीने घेतला आहे. सध्या 3 ते 4 दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. मात्र उपलब्ध पाणीसाठय़ानुसार यापुढे पाणीपुरवठय़ात कपात केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

एरवी जूनच्या पहिल्या आठवडय़ात पावसाला सुरुवात होते. मात्र यंदा पावसाला सुरुवात होण्यास विलंब झाला आहे. पण याचा फटका शहरातील पाणीपुरवठय़ाला बसला आहे. सध्या राकसकोप जलाशयाची पाणीपातळी कमी झाली आहे. शहरवासियांना 3 ते 4 दिवसांआड पाणीपुरवठा केला जात होता. यंदा मुबलक पाणीसाठा असल्याने आतापर्यंत पाणीपुरवठा नियोजनात कोणताच बदल करण्यात आला नाही. मात्र पावसाने दडी मारल्याने जलाशयाची पाणीपातळी कमी झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा नियोजनात बदल करण्याचा निर्णय एलऍण्डटी कंपनीने घेतला आहे.

राकसकोप जलाशयाची पाणीपातळी 2452.90 फूट इतकी आहे. 2444 फुटापर्यंत पाणी उपसा करता येऊ शकतो. त्यामुळे जलाशयात केवळ 9 फूट पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा 10 ते 15 दिवस पुरवठा करणे शक्मय आहे. जर पाऊस लांबल्यास डेडस्टोरेजमधील पाणी उपसा करावे लागणार आहे. पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ नये, याकरिता एलऍण्डटी कंपनीने खबरदारीची उपाययोजना म्हणून पाणीपुरवठय़ात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाण्याच्या उपलब्धतेनुसार 5 ते 6 दिवसांआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाऊस न झाल्यास पुन्हा बदल करण्याची शक्मयता आहे. जोराचा पाऊस झाल्यानंतरच राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. पण सध्या पाऊस नसल्याने असलेला साठा जपून वापरणे गरजेचे आहे. तसेच पाणी गरम करून प्यावे, असे आवाहन एलऍण्डटी कंपनीने पत्रकाद्वारे केले आहे. त्यामुळे पाण्याची बचत करण्याची जबाबदारी शहरवासियांची असून पाणी वाया जात असल्यास त्याची माहिती
वॉल्व्हमॅनला देणे आवश्यक आहे.

Related Stories

डीसीसीच्या मुरगोड शाखेत 6 कोटींची चोरी

Amit Kulkarni

ग्रा.पं.निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची धडपड

Patil_p

पावसामुळे बेकिनकेरे गावात नुकसान

Patil_p

कोचरीत 6 दिवसांनंतर मगरीला पकडण्यात यश

Amit Kulkarni

‘विन्यासा’ फॅशन शो रंगतदार

Amit Kulkarni

तिगडी येथील तरुणाचा खून

Amit Kulkarni
error: Content is protected !!