चोडण येथे आयोजन, सावईवेरे लक्ष्मी भजनी मंडळ द्वितीय
वार्ताहर /जुने गोवे
चोडण येथील श्री देवकी कृष्ण हौशी युवक मंडळाच्या रौप्य महोत्सवी अखिल गोमंतकीय भजनी स्पर्धेचे पहिलं पारितोषिक रुपये 10000/- रोख व कैलासवासी नागेश व प्रेमावती मापारी यांच्या स्मरणार्थ एकनाथ मापारी आणि बंधु पुरस्कृत फिरता चषक श्री गणेशाची प्रतिमा उसगाव येथील श्री राम पुरुष आदिनाथ भजनी मंडळाने पटकावलं. दुसरं बक्षीस रु 7000 श्री लक्ष्मी भजनी मंडळ सावयी वेंरे, तीसरे बक्षीस रु 5000/- श्री सातेरी केळबाई कला आणि संस्कृतीक भजनी मंडळ लाडफे डिचोली यांनी पटकाविली. पहिलं उत्तेजनार्थ बक्षीस श्री दादा महाराज भजनी मंडळ बांदिवडे, दुसरं उत्तेजनार्थ बक्षीस श्री भगवती प्रासादिक भजनी मंडळ चिंबल तर तीसरे उत्तेजनार्थ बक्षीस श्री विष्णू कला व सांस्कृतिक संस्था नवें वाडे वास्को यांनी पटकावली. उत्कृष्ट गायक अमोल केरकर लक्ष्मी भजनी मंडळ सावयी वेंरे, उत्कृष्ट हार्मोनियम वादक साबाजी मोपकर श्री सातेरी केळबाई कला आणि सांस्कृतिक मंडळ लाडफे डिचोली व उत्कृष्ट पखवाज वादक संदिप च्यारी श्री राम पुरुष आदिनाथ भजनी मंडळ उजगांव यांनी वैयक्तिक बक्षिसे पटकावली.
महिला गटातील पहिलं बक्षीस रु 5000/- व स्मृतिचिन्ह श्री महादेव भुमिका गोळणेश्वर महिला भजनी मंडळ साळ डिचोली, दुसरं बक्षीस रु 3000/- श्री भावीकादेवी महिला भजनी मंडळ मालार दिवाडी तर तीसरे बक्षीस रु 2000/- श्री मदनंत सातेरी खामीणी महिला भजनी मंडळ सावयी वेंरे फोंडा यांनी पटकाविले. उत्तेजनार्थ बक्षीस स्वरदीप महिला भजनी मंडळ आमोणा यांना देण्यात आले. उत्कृष्ट गायिका कु. प्रज्ञा प्रकाश रावळ श्री भाविकादेवी महिला भजनी मंडळ दिवाडी, उत्कृष्ट पखवाज वादक स्वरुपानंद च्यारी, श्री महादेव भुमिका घवनाळेश्वर महिला भजनी मंडळ साळ डिचोली आणि उत्कृष्ट हार्मोनियम वादक रोशन च्यारी श्री महादेव भुमिका महिला भजनी मंडळ साळ डिचोली यांना वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली. दोन्ही गटातील स्पर्धेचे परीक्षण श्री धनारथ म्हारदोळकर व श्री शंकर सावंत यांनी केले.
त्यापुर्वी सकाळी भाजपा राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ आरती बांदोडकर, जे÷ भजनी कलाकार आनंद वळवयीकर,परिक्षक धनारथ म्हारदोळकर, शंकर सावंत, देवस्थान अध्यक्ष दयानंद वळवयीकर, हौशी मंडळाचे अध्यक्ष गजानन चोडणकर, सचिव एकनाथ मापारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मये मतदार संघाचे आमदार श्री प्रेमेंद्र शेट, आदरणीय पाहूणे म्हणून मयें जिल्हा पंचायत सदस्य श्री शंकर चोडणकर,खास निमंत्रित पाहुणे म्हणून पंचायत सदस्य श्री संजय कळंगुटकर व श्री पांडुरंग वायंगणकर, देवस्थान चे अध्यक्ष श्री बाबलो ( दयानंद) वळवयीकर, स्पर्धेचे परीक्षक धनारथ म्हारदोळकर व शंकर सावंत व देवकी कृष्ण हौशी युवक मंडळाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. सूत्रसंचालन तुकाराम चोडणकर यांनी तर गजानन चोडणकर यांनी आभार मानले.