Tarun Bharat

श्रीमती उषाताई गोगटे कन्या विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव : बेळगाव शिक्षण संस्थेच्या श्रीमती उषाताई गोगटे कन्या विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून काकडे फौंडेशनचे अध्यक्ष किशोर काकडे, तर गौरव अतिथी म्हणून शाळेच्या माजी विद्यार्थिनी भाग्यश्री कुलकर्णी, वैशाली चीत्रगार व वाणी चित्रगार उपस्थित होते.

शाळा सुधारणा समितीचे चेअरमन चिंतामणी ग्रामोपाध्याय उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते ध्वज फडकाविण्यात आले विद्यार्थिनींनी व शिक्षक वृंद कडून देश भक्ति गीत सादर करण्यात आले. वनिता मुंनोळी या दहावीच्या आदर्श विद्यार्थिनीला उषाताई गोगटे स्मरणार्थ शिरीष गोगटे पुरस्कृत रू 5000/- चे पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापक एम के मादार यानी सर्वांचे स्वागत केले, मिनाक्षी वडेर यांनी प्रास्ताविक केले. सरस्वती देसाई यांनी आभार मानले. वनिता मुंनोळी यांनी सूत्रसंचालन केले.

हा कार्यक्रम विठलाच्यार्य शिवनगी प्राथमिक शाळा व उषाताई गोगटे कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता. गव्हर्निंग चेअरमन सुहास सांगलीकर, शिक्षक वृंद, विद्यार्थीनी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

‘जलजीवन’ला अपेक्षेप्रमाणे गती आवश्यक

Amit Kulkarni

रात्रभर भजन करून नववर्षाचे स्वागत

Patil_p

ज्ञान प्रबोधन मंदिर शाळेला विज्ञान स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद

Amit Kulkarni

मीरा यांच्या ‘रेशीमबंध’ पुस्तकाचे आज प्रकाशन

Omkar B

शहराच्या प्रवेश मार्गांवर कचऱयांचे ढिग

Amit Kulkarni

कर्नाटक: सिद्धरामय्या कोरोना निगेटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!