Tarun Bharat

उत्तरप्रदेशच्या रोहित रामाची खानापूर मॅरेथॉनमध्ये बाजी

जांबोटी मल्टीपर्पजचे आयोजन : 150 स्पर्धकांचा सहभाग

वार्ताहर /खानापूर

खानापूर येथे जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीने गुरुवारी आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या रोहित रामा याने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत बेळगाव, खानापूर सह उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश येथील 150 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग दर्शवला होता. मडगाव(गोवा) येथे शुक्रवारी झालेल्या लोकोस्तव कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

जांबोटी मल्टीपर्पजच्या खानापूर येथील शाखेपासून मोदेकोप व पुन्हा त्याच रस्त्यावरून परत खानापूर पर्यंतची 21 कि.मी.मॅरेथॉन  झाली. या मॅरेथॉन मध्ये प्रथम क्रमांक रोहित रामा इलाहाबाद (उत्तर प्रदेश), द्वितीय  क्रमांक मोनू कुमार आग्रा (उत्तर प्रदेश) तृतीय क्रमांक अनंत गावकर अबनाळी (ता. खानापूर) यांनी पटकावला.

विजेत्यांना मडगाव(गोवा) येथे शुक्रवारी झालेल्या लोकोस्तव कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सभापती रमेश तावडकर, विलास बेळगावकर, पुंडलिक नाकाडी, मनोहर डांगे, विद्याधर बनोशी, खाचाप्पा काजूनेकर, पांडुरंग नाईक, मारुती मादार, यशवंत पाटील, अनिल देसाई, दामोदर कणबरकर, भैरू पाटील, राजश्री तुडयेकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

जिल्हय़ात शुक्रवारी 1300 नवे रुग्ण

Amit Kulkarni

अटक केलेल्या कार्यकर्त्यांची कारागृहात रवानगी

Patil_p

शंभर फूट उंचीच्या ध्वजस्तभांवर फडकविला राष्ट्रध्वज

Tousif Mujawar

टेंपररी विद्युत मिटरचा खर्च जाचक

Patil_p

शुक्रवारी 52 वाहने जप्त

Amit Kulkarni

दिल्लीहून परतलेल्या ‘त्या’ 10 जणांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण

Patil_p