उत्तरकाशी : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील द्रौपदीच्या पर्वतावर मोठ्या प्रमाणावर हिमस्खलन झाले. या दुर्घटनेत 10 लोकांचा मृत्यू झाला तर 20 हून अधिक गिर्यारोहक प्रशिक्षणार्थी अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या संदर्भात ट्विट केले होते.
या घटनेत आतापर्यंत किमान 10 लोक ठार झाले असून 8 जणांना वाचवण्यात यश आले आहे. असे नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगचे प्राचार्य अमित बिश्त यांनी सांगितले. तर जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), भारतीय लष्कर आणि इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) जवानांकडून जलद मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, अशी महिती मुख्यमंत्री धामी यांनी सांगितली.यासंदर्भातील बातमी पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या दुर्घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “हिमस्खलनामुळे झालेल्या मौल्यवान जीवितहानीमुळे त्यांना अत्यंत दुःख झाले आहे” संरक्षण मंत्र्यांनी मुख्यमंत्री धामी यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.