प्रकाश कुलकर्णी दोन गटात विजेते, बेंगळूर-मुंबई उपविजेते
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा कॉन्ट्रक्ट ब्रिज संघटना टिळकवाडी बेळगाव आयोजित यशवंतराव कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ निमंत्रितांच्या आंतरराज्य खुल्या ब्रिज स्पर्धेत व्ही-2 पुणे बेळगाव संघाने विजेतेपद पटकाविले. बेंगळूर-मुंबई संयुक्त उपविजेते ठरले. बेळगावच्या प्रकाश कुलकर्णी यांनी ईस्ट-वेस्ट पेयर्स आणि टीम इव्हेंट अशा दोन गटात विजेतेपद मिळवले.
ब्रिज स्पर्धा अंतिम निकाल-
व्ही-2 पुणे बेळगाव प्रथम क्रमांक, बेंगळूर-मुंबई संघ द्वितीय क्रमांक, शर्मा संघ बेंगलोर तृतीय क्रमांक, खोत संघ सांगली चौथा क्रमांक.
बेळगाव विजेते प्रथम क्रमांक बरवे हेगडे काळे आणि साठे प्रथम क्रमांक. चंद्रकांत संघ द्वितीय क्रमांक.
पेयर्स (नॉर्थ साऊथ)- गोडबोले आणि मुतालिक प्रथम क्रमांक, ईस्ट-वेस्ट पेयर्स विजेते ः प्रकाश कुलकर्णी, आलुरकर, भिडे दांपत्य द्वितीय क्रमांक, सुहानी आणि पाटील, तृतीय क्रमांक, देशपांडे आणि अनगोळ, चौथा क्रमांक, बेळगाव जोडी चौथाकाने आणि कडोलकर प्रथम क्रमांक, आलुरकर आणि प्रकाश कुलकर्णी, फर्नांडिस आणि प्रसाद द्वितीय, हेगडे आणि बर्वे यांनी तृतीय क्रमांक, गाडगीळ आणि शिंदे चतुर्थ क्रमांक.
अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षिस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे श्रीकुमार भिडे (पुणे) यांच्या हस्ते विजेत्या-उपविजेत्या ब्रिज पटूंना रोख बक्षिस देवून गौरविण्यात आले. यावेळी बेळगाव जिल्हा ब्रिज कॉन्ट्रक्ट संघटनेचे अध्यक्ष एस. पी. चंदगडकर, सेपेटरी नंदू देशपांडे, एम. आय. हेगडे, सतीश जाधव, आर. एल. बर्वे, एस. एम. काळे, एच. डी. कार्दोळकर, आदी सदस्य उपस्थित होते.
या स्पर्धेत गोवा, महाराष्ट्र-कर्नाटकसह येथील नामवंत ब्रिज पटूंनी भाग घेतला होता. बेंगलोर संघ बेळगाव जिल्हा कॉन्ट्रक्ट ब्रिज संघ आंतरराष्ट्रीय ब्रिज स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या स्पर्धेचे संचालक म्हणून डी. मिनीज यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बेळगाव जिल्हा कॉन्ट्रक्ट ब्रिज संघटनेच्या पदाधिकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले.